यशवंत पवार यांना कोरोना योद्धा पुरस्कार
सोलापूर (प्रतिनिधी )
जगाच्या पाठीवर कोरोना या महामारी ने धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद महाराष्ट्रासह सोलापूर शहरात उमटले असून दिवसेंदिवस अशा कठीण प्रसंगसमयी पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन यांनी जनतेसाठी वारंवार सूचना आदेश निर्देश जनतेपर्यंत पोहचवून जनतेला वारंवार साबणाने हात धुणे, सानिटायझर चा वापर करणे, तोंडाला मास्क अथवा रुमाल वापरणे सुरक्षित अंतर ठेवणे व सर्वसामान्य माणसाला कोरोना ची लागण होऊ नये म्हूणन पत्रकार यशवंत पवार यांनी संचार बंदी काळात बहुमूल्य काम केले असून याची दखल घेऊन मानवधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने पत्रकार यशवंत पवार यांना कोरोना योद्धा म्हूणन पुरस्कार देण्यात आला आहे याबाबत मानवधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष अफसर शेख,कार्याध्यक्ष कमलेश शेवाळे संपर्क प्रमुख वजीर शेख राज्य सचिव लोकेश गुप्ता राज्य युवा सचिव पुष्कर सराफ सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष योगेश स्वामी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत