दैनिक तुफान क्रांती च्या उपसंपादक पदी यशवंत पवार यांची नियुक्ती*

सांगोला -पत्रकारिता एक वसा चळवळ विचार सडेतोड लेखन परखड विचार आपल्या ज्वालामुखी लेखणीतून सतत समाजाच्या भल्यासाठी उन्नतीसाठी शासन दरबारी आवाज उठवणारे , गेली पंधरावर्षांपासून पत्रकारिता करत असलेले सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून वेगवेगळ्या दैनिकातून आपले निर्भीड व परखड विचारांची सतत मांडणी करणारे पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यशवंत पवार यांची दैनिक तुफान क्रांती च्या सोलापूर विभाग उपसंपादक पदी नुकतीच सांगोला येथे दैनिक तुफानक्रांती कार्यालयात नियुक्ती करण्यात आली असून दैनिक तुफानक्रांती चे संपादक मिरझागालिब मुजावर यांनी यशवंत पवार यांचा सत्कार करून ओळख पत्र व नियुक्ती पत्र देण्यात आले
यशवंत पवार यांनी
पत्रकार संरक्षण कायदा
जेष्ठ पत्रकार पेन्शन योजना
पत्रकारांसाठी घरकुल योजना
राज्यातील पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी
पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी
यादीवर नसलेल्या सर्वच वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती मिळणे
अधिस्वीकृती बाबत जाचक अटी रद्द करणे
पत्रकार धमकी मारहाण हल्ला बाबत नेहमीच आंदोलन उपोषण च्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे
इत्यादी पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून यशवंत पवार यांच्या माध्यमातून नुकताच कोरोना च्या पार्शभूमिवर राज्यातील पत्रकारांना पन्नास लाखाचा विमा राज्य सरकार ने मंजूर केला आहे
पत्रकारांसाठी नेहमी सजग व दक्ष असणाऱ्या यशवंत पवार यांच्या दैनिक तुफान क्रांती च्या उपसंपादक पदी नियुक्ती झाल्याने पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त झाला असून अनेकांनी यशवंत पवार यांचे आहे अभिनंदन केले आहे.