संपादक विष्णू करमपुरी मारहाण प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी /कर्मचारी यांना निलंबित करा पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
सोलापूर -दैनिक सोलापूर भूषण चे संपादक व जेष्ठ पत्रकार विष्णू कारंमपुरी दिनांक 10/7/2020 रोजी सोलापूर येथील पार्क चौकात पोलीस वाहन तपासणी करत असताना त्यांचा मुलगा आपल्या आजारी पत्नी ला दवाखान्यात घेऊन जात असताना
मुलाची मोटारसायकल पोलिसांनी जप्त का केली होती याबाबत कारंमपुरी यांनी माझा मुलगा चुकला असेल तर कायदेशीर मी दंड भरण्यास तयार आहे असे म्हणतं असताना त्याठिकाणी बंदोबस्त साठी असलेल्या पोलीस अधिकारी /कर्मचारी यांनी कारंमपुरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्यावर व कुटूंबातील सदस्यांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अपमानित केले आहे या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने निषेध व्यक्त करून कारमपुरी यांना मारहाण शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकारी /कर्मचारी यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे
सदरची घटना पोलीस खात्याला बदनाम करणारी तर आहेच शिवाय लोकशाही च्या चौथ्यास्तंभाला मारक असून अश्या घटना जेष्ठ पत्रकार बाबत घडत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा सवाल पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केला आहे
जेष्ठ पत्रकार विष्णू कारंमपुरी यांना मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी /कर्मचारी यांना निलंबित करा अन्यथा पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे.