वीज बील माफ करण्यात यावे अन्यथा भीम आर्मीच्या वतीने आंदोलनाचा ईशारा.! – ANC News
महाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending

वीज बील माफ करण्यात यावे अन्यथा भीम आर्मीच्या वतीने आंदोलनाचा ईशारा.!

भीम आर्मीच्या वतीने कार्यकारी अभियंता शिंदे यांना निवेदन

सोलापूर :- वीज बील माफ करण्यात यावे या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता ( प्रशासन ) शिंदे मंडल कार्यालय सोलापूर यांना भीम आर्मीच्या वतीने देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जुनी मिल कंपाऊंड महावितरणच्या गेट समोर दिनांक १७-८-२०२०२० रोजी भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मार्च २०२० ते जुलै २०२० या लाॅकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावे. एप्रिल २०२० पासून केलेली अन्याय कारक दरवाढ रद्द करण्यात यावी. वरील बाबींचा निर्णय होत नाही तो पर्यत कोणाचेही वीज विद्युत पुरवठा खंडित करू नये. ज्या वीज ग्राहकांनी विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून उपासमारी करून वीज बील भरले आहे. अशा ग्राहकांना देयक शुल्काचा परतावा मिळावा.

यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र संघटक डॉ.किर्तीपाल गायकवाड,भीम आर्मी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष ॲड.अखिल शाक्य,जिल्हा महासचिव दर्शना गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष अमर पवार, शहर अध्यक्ष मनोज चलवादी,शहर सचिव विशाखा उबाळे, सह सचिव महेश चलवादी,युवा शहर कार्याध्यक्ष अनिकेत गायकवाड , शहर सरचिटणीस अजय मैंदर्गीकर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष सूचना:
सदर निषेध , निवेदन धरणे,आंदोलन हे तोंडावर मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवून करण्यात येणार आहे

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: