तळीरामांनी देशाची आर्थिक बाजू सांभाळली…..! पहा ते कसे – ANC News
देश विदेश
Trending

तळीरामांनी देशाची आर्थिक बाजू सांभाळली…..! पहा ते कसे

एकंदरीत घर उद्वस्थ करणारी दारूने मात्र, देशाची आर्थिक बाजू सांभाळली...!

मुंबई : देशा सह राज्यात कोरोनाचा संकट सुरू आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्यात आला, मग सारी अर्थव्यवस्था कोसळली होती. पण अशात राज्यात दारू विक्रीला मात्र परवाणगी देण्यात आली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला, तळीरामांचा आधार मिळाला अस म्हणायला काही वावग ठरणार नाही. कोरोना काळात राज्यात रोजगार बुडाला त्यामुळे आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावली पण एकीकडे ही परिस्थिती मद्य विक्रीमुळे सुधारली. एकंदरीत घर उद्वस्थ करणारी दारूने मात्र देशाची आर्थिक बाजू सांभाळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४ महिन्यात राज्यात १५०९ लिटर मद्य विक्री झाली आहे. यातून राज्य सरकारला तब्बल २३६२ कोटींचा महसूल मिळाला आहे. मद्य विक्रीतमुळे कोटीच्या कोटी उड्डाणं घेत तब्बल ३९०० कोटींची मद्य विक्री झाली आहे. यामध्ये ६८२ कोटींची देशी दारू, तर १५६८ कोटींचं विदेशी मद्य, तर १११ कोटींच्या बीयर विक्रीतून महसूल मिळाला आहे.

अन एकीकडे आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय आणि उद्योग सुरू झाले आहे. त्यामुळे आता बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. परंतु या सर्वांतून कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यताच आहे.

एकीकडे राज्य अनलॉक – ४ टप्प्यात आहे, तर दुसरीकडे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम आहे. राज्यात २ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: