सोलापुरातील हत्तुरेवस्ती येथे पोलिसांकडून कोरोनाबाबत जनजागृती ( solapurat polisankadun corona janjagruti )
सोलापुरात पोलिसांकडून कोरोना जनजागृती सुरूच...!
सोलापूर (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये सोलापुरातील हत्तुरे वस्ती या भागात विजापूर नाका पोलिसांकडून जनजागृती करत फेत काढण्यात आली. यावेळी पोलिसांनी हत्तुरे वस्ती येथील लक्ष्मीनगर, ओम नमशिवाय नगर, मल्लिकार्जुन नगर स्वामी विवेकानंद नगर ,हरलय्या नगर, राहुल नगर, तसेच टिकेकरवाडी आदी भागात जाऊन नागरिकांना घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे असे सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील यांनी आवाहन केले.
यावेळी माजी परिवहन सभापती – विजयकुमार हत्तुरे, पोलीस उपनिरीक्षक – बालाजी म्हस्के, बीट मार्शल – गणेश बीरकुटे, हवालदार – देविदास वाल्मिकी, राजकुमार नागशेट्टी, महिला पोलीस शिपाई – प्रीती जाधव, महिला होमगार्ड – यशोदा यादव, शहनाज शेख, सुनीता जाधव, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. आगलावे, संजय पाटील, धनू वरनाळे , सफाई आरोग्य निरीक्षक – सचिन वडवेराव, अमजद शेख, राजू नागणसुरे आदी उपस्थित होते. प्रबोधन अभियानात पोलीस उपनिरीक्षक मस्के यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क लावावे, साबणाने हात स्वच्छ धुवावेत यांसह विविध उपाययोजना सांगत कोरोनावर मात करावी, असे आवाहन केले. यावेळी परिवहनचे माजी सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सर्वांचे आभार मानले.