सोलापुरात पत्रकाराचे पुन्हा एकदा कौतुक, पहा कोणाचे झाले कौतुक…! ( solapurat patrakarache punha ekada kautuk ) – ANC News
महाराष्ट्रराजकीय
Trending

सोलापुरात पत्रकाराचे पुन्हा एकदा कौतुक, पहा कोणाचे झाले कौतुक…! ( solapurat patrakarache punha ekada kautuk )

शांतता कमिटी सदस्य पदी यशवंत पवार यांची दुसऱ्यांदा निवड

सोलापूर – शहरातील सामाजिक सलोखा शांतता, तसेच साजरे केले जाणारे वेगवेगळे उत्सव, बाबत यशवंत पवार यांनी पोलीस आयुक्त कार्यालय मध्ये, शांतता कमिटी मध्ये अनेक उपायोजना व वेळोवेळी सूचना करून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, रमजान ईद, बकरी ईद, गणेशउत्सव, दसरा सह अनेक साजरी करणाऱ्या सणा बाबत आपले मत व विचार शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनला कळवले होते.

पत्रकारांच्या प्रश्नासह समाजातील दुःखी पीडित घटकाला न्याय देण्यासाठी थेट पोलीस आयुक्त यांना संवाद साधून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याने, यशवंत पवार यांच्या सामाजिक चळवळ, तळमळ व धडपड या कामाची सोलापूर पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन, यशवंत पवार यांची पोलीस आयुक्त कार्यालय शहर शांतता कमिटी मध्ये सलग दुसर्यांदा सदस्य पदी निवड केली असून, याबाबत यशवंत पवार यांचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे. एका अभ्यासू पत्रकाराची निवड झाल्याने पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: