सोलापुरात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते….!
पुन्हा एकदा सोलापुरात सामाजिक संस्थांनी घेतले पुढाकार...!

आज दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी प्रबुद्ध बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था, बुद्धनगर फॉरेष्ट सोलापूर च्या वतीने क्रांती महिला संघ सोलापूर च्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात खालील आरोग्य सेवा देण्यात आल्या
१. रक्त तपासणी (HIV, गर्मी, कावीळ)
२. मोफत औषधे
३. महिलांच्या लैंगिक आजारा बाबतीत मार्गदर्शन/समुपदेशन
यावेळी परिसरातील महिलांनी या आरोग्य शिबिराचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. सदर आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर मिलिंद शेंडगे, प्रमुख मार्गदर्शक विश्वास नागटिळक, नागेश हाडमोडे, प्रयास गायकवाड, अभिषेक माने, राकेश हाडमोडे ,ऋषिकेश हाडमोडे, वर्षा लोकरे, संगीता शिवशरण, प्रमिला थापटे, संजय सूर्यवंशी, संध्या तळभंडारे, प्राची गायकवाड, संजय जाधव, व इतर कार्यकर्ते तसेच क्रांती महिला संस्थेचे प्रकल्प अधिकारी ऋषिकेश तळभंडारे, समुपदेशक प्रभावती आखाडे, क्षेत्रीय समनव्यक अलका पुजारी आणि कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.