सोलापुरात आता आठवड्याच्या सातही दिवस दुकाने राहणार खुली…! – ANC News
माझं सोलापूर
Trending

सोलापुरात आता आठवड्याच्या सातही दिवस दुकाने राहणार खुली…!

महापालिकेच्या नियमातच दुकाने खुली राहतील...!

सोलापूर शहरातील व्यापारीपेठेतील सर्व दुकान यापुढे रविवारसह आठवड्यातील सातही दिवशी, सोशल डिस्टंसिंग च्या नियमांना अधीन राहून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा सुधारित आदेश महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दि २९ रोजी सायंकाळी प्रसिद्ध केला आहे. जे दुकानदार सोशल डिस्टंसिंचे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि दुकांदारावर दुकान बंद करण्याची कारवाई होईल, तसेच जे नागरिक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

सोलापूर महानगरपालिकेने १ सप्टेंबर पासून शहरातील प्रत्येक घराला प्रतिमहा ५० रुपये, तर व्यवसायिक आस्थापनांना ६० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत प्रतिमहा उपयोगकर्ता शुल्क लागू करण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. घनकचरा संकलनासाठी हे शुल्क आकारण्यात येणार आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: