सोलापूर नृत्य परिषदेच्या अध्यक्षपदी राजशेखर पंचे यांचे एकमताने निवड…! – ANC News
क्रीडा व मनोरंजनमाझं सोलापूर
Trending

सोलापूर नृत्य परिषदेच्या अध्यक्षपदी राजशेखर पंचे यांचे एकमताने निवड…!

सोलापुरातील नृत्य परिषदेची बैठक झाली, बैठकीतील चर्चेत नवे अध्यक्ष पद जाहीर केले....!

सोलापूर :- सोलापुर नृत्य परिषद, सोलापूर यांची दिनांक ८ ऑगस्ट रोजी श्रीनिअंबा परफॉर्मिंग आर्ट, सोलापूर येथे सोशल डिस्टसिंग ठेऊन ही बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये अध्यक्ष पदासाठी कोणाची नेमणूक करावी या संदर्भात चर्चा सुरू होती, तर सर्वांच्या एकमताने राजशेखर पंचे यांचे अध्यक्षपदी निवड झाली असून, सिनियर सिटीजन या अध्यक्ष पदी राहून काम नित्यनियमाने केले पाहिजे. कलेचा वारसा, कलेचे आदर, कलाक्षेत्रातील अनुभव यासर्वाचा विचार करून, हे अध्यक्षपद भूषविले जाते, तर राजशेखर पंचे यांच्या सारखे अनुभवी, कलेप्रति प्रेम-निष्ठा आणि शिस्तबद्ध काम असल्यामुळे सर्वानुमते एकमत आल्याने त्यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

त्यावेळी नृत्य परिषदेतील सभासद रघुनाथ गड्डम, महेश पाठकुलकर, शिल्पा दिक्षित, विणा पाटील, आश्विनी जाधव, अंबिका काटवे, श्रीनिवास काटवे, राकेश सोनी, श्रीकांत गोचडे, अदिब सय्यद, धनराज व्हनमोरे, श्रद्धा हुल्लेनौरु, आकाश मस्के, अनिल राठोड, श्रीकांत कोळी हे आदी नृत्य दिग्दर्शक उपस्थित होते आणि नृत्य परिषद, सोलापूरचे अध्यक्ष राजशेखर पंचे यांचे अभिनंदन करून, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: