राज्यातील युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता द्यावी; पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी – ANC News
माझं सोलापूर
Trending

राज्यातील युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता द्यावी; पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

सोलापूर : जगाच्या पाठीवर कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला असून त्याचा प्रादुर्भाव देशात व राज्यात मोठया प्रमाणात वाढला आहे अश्या कठीण व बिकट परिस्थितीत युट्युब चॅनल च्या संपादक व पत्रकारांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे युट्युब चॅनल चे संपादक व पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून कोरोना रोगाबाबत वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या भल्यासाठी आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून अश्या युट्युब चॅनल च्या संपादक व पत्रकारांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने व शासन दरबारात नोंदणी नसल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार च्या पत्रकारांसाठी असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याने युट्युब चॅनल च्या संपादक व पत्रकारांची अवस्था अत्यंत दयनीय व गंभीर झाली असून या युट्युब चॅनल माध्यमातून अनेक युवा तरुण संपादक व पत्रकार आपले नशीब आजमावून पाहण्याचा प्रयत्न करत आहेत
महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून जनतेच्या मनात प्रचंड भीती व दडपण निर्माण झालं आहे कोरोना बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार जरी वेगवेगळ्या उपाययोजना करत असलेतरी राज्यातील युट्युब च्या संपादक व पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून आपले राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडले असून सरकार व जनता यामधील दुवा म्हूणन प्रमुख भूमिका प्रामाणिक पणे बजावली आहे या बाबत सरकार ने गांभीर्याने विचार करायला हवा कोरोना रोग जीवघेणा आहे याची माहिती असताना देखील राज्यातील युट्युब च्या संपादक पत्रकारांनी आपल्या जीवाची बाजी लावून केंद्र सरकार, राज्य सरकार पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन महापालिका प्रशासन यांनी जनतेला दिलेल्या सूचना, आदेश, निर्देश आपल्या युट्युब च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली आहे
तरी मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: