पत्रकार सुरक्षा समितीची सोलापुरात बैठक…..! – ANC News
माझं सोलापूर
Trending

पत्रकार सुरक्षा समितीची सोलापुरात बैठक…..!

पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन पत्रकारांना ओळखपत्र देण्यात आले....!

सोलापूर – पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथे बैठक संपन्न या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते
या बैठकी पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकार समान पेन्शन,
पत्रकारांवरील दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी, यादीवर नसलेल्या वृत्तपत्राना शासकीय जाहिराती मिळणे, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी, यासह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन, पत्रकारांच्या प्रश्नावर त्रीव्र आंदोलने करण्याचा निर्धार करण्यात आला.

ओळख पत्र वितरण यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन सदस्य विवेकानंद खेत्री, अंबादास येलगेटी, इम्तियाज अक्कलकोटकर यांना पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार यांच्या हस्ते ओळख पत्र देऊन, सत्कार करण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष प्रभाकर एडके, शहर संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार, अक्षय बबलाद, इस्माईल शेख, प्रसाद ठक्का, बिपीन दिड्डी, सुनील काडोदे, महंमद शेख, विष्णू सुरवसे, शिरीष भानावत, अशोक माचण, हरीश पवार, इम्रान सगरी, योजना कामतकर, लक्ष्मण गणपा, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: