पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी इलियास शेख तर प्रसिद्धी प्रमुख पदी अल्ताफ शेख यांची निवड – ANC News
महाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending

पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी इलियास शेख तर प्रसिद्धी प्रमुख पदी अल्ताफ शेख यांची निवड

पत्रकार सुरक्षा समितीमध्ये विविध विषयांवर चर्चा....!

सोलापूर /पत्रकार सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते या बैठकीत
पत्रकार संरक्षण कायदा,
जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन,
पत्रकारांवरील खोटे गुन्ह्यांची चौकशी,
पत्रकारांसाठी घरकुल योजना,
पत्रकारांवरील होणारे हल्ले धमकी मारहाण,
यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ला पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळणे,
राज्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष,

राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता मिळणे
या सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन जिल्हा उपाध्यक्ष पदी इलियास शेख व शहर प्रसिद्धी प्रमुख पदी अल्ताफ शेख यांची एकमताने निवड करण्यात येऊन त्यांचा शाल व पुष्पहार घालून पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी कामगार नेते व दैनिक सोलापूर भूषण चे संपादक विष्णू कारमपुरी महाराज जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार शहर संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार सचिव अरुण सिडगिड्डी कलीम मामू शेख, बाबा काशीद सोमनाथ मुंजे विष्णू सुरवसे, बिपीन दिड्डी, हरीश पवार योगिनाथ स्वामी खिजर पगडीवाले मोहसीन कोतकुंडे सुभाष म्हेत्रे, सतीश गडकरी, दिगंबर इप्पलपल्ली, विश्व्जीत कारंडे, महंमद इंडिकर अक्षय बबलाद ,अजीम, शेख प्रसाद ठक्का, इस्माईल शेख , तानाजी माने, योजना कामतकर भास्कर अल्ली दिनेश रेवणकर, विकास आमटेकर, प्रदीप पेद्दापल्लीवार इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते युवा पत्रकार इलियास शेख व अल्ताफ शेख यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये आंनदाने वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्व पत्रकारांमधून अभिनंदन होत आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: