पत्रकार सुरक्षा समितीच्या भीकमांगो आंदोलनला पोलिसांनी नाकारली परवानगी
पत्रकारांची दखल घेतली नाही, हे चिन्ह स्पष्ट पणे दुसून येत आहे....!

सोलापूर (प्रतिनिधी ) कोरोना या रोगाने जगात धुमाकूळ घातला असून, त्याचे पडसाद सोलापूर शहर व जिल्यात उमटले असून, याच कोरोना संक्रमण काळात दैनिक सकाळ चे पत्रकार २० जुलै रोजी विजयकुमार सोनवणे यांचे दुर्दैवी निधन झाले. पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्या कुटूंबाला पन्नास लाख रुपये मदत देण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने २७ जुलै रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मेल करून, मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री यांनी याबाबत वेळेत निर्णय न घेतल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने ६ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून, पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्या कुटूंबाला राज्यसरकार कढून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
राज्यसरकार चे डोके ठिकाण्यावर आहे का ?
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, राज्यातील अनेक पत्रकार आपला जीव धोक्यात घालून व कुटूंबाला बाजूला सारून कोरोना बाबत बातम्या करत असताना, देखील पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांची भूमिका उदासिन राहिली असून, पत्रकारांच्या बाबतीत राज्यसरकार केवळ वेळकाडू व बघ्याची भूमिका घेत असल्याने राज्यसरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का ? असा प्रश्न प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी विचारला असून, सरकारवर सडकून टीका केली आहे.
भीकमांगो आंदोलनना पोलिसांनी परवानगी नाकारली
पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने सदर बाझार पोलीस स्टेशनला २८ ऑगस्ट रोजी लेखी पत्र देऊन, भीक मांगो आंदोलन करून, भिकेतून मिळालेले रुपये मुख्यमंत्री निधीला देणार असलेबाबत कळवून दिनांक ५ सप्टेंबर रोजी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर काळ्या फिती लावून व भिकेचा कटोरा हातात घेऊन, भीकमांगो आंदोलन करणारं असल्याने पोलिसांना परवानगी मागण्यात आली होती, परंतु पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली असून, तसें लेखी पत्र देण्यात आले आहे.