सचिन निकम यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रधान – ANC News
महाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending

सचिन निकम यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रधान

पत्रकार सुरक्षा समिती ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संघटना आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश हा पत्रकारांचे मूलभूत प्रश्न सोडविणे त्याचबरोबर त्याच्या सुरक्षेसाठी लढा देने हा आहे. या संघटनेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील प्रामाणिक व उत्तम कार्य पार पडणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. जेणेकरून ती व्यक्ती त्यांच्या क्षेत्रामध्ये आणखीन जोमाने आपले कार्य बजावतील व एक आदर्श व्यक्तिमत्त्व निर्माण करतील.

सोलापूर(प्रतिनिधी) : पत्रकारिता एक वसा, चळवळ, विचार, ध्यास म्हूणन हॅलो महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी आपली प्रामाणिक पत्रकारिता खर्ची घातल्याबद्दल पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हूणन पुरस्कार देण्यात आला .
सचिन निकम यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी केंगार, ANC News चे मुख्य संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य हरिष पवार, बाबा काशीद, अण्णा धोत्रे, विलास काळे, सिद्धेश्वर काळे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातून सचिन निकम यांना आदर्श पत्रकार म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत असून एक तरुण व उमद्या पत्रकाराला पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातील पत्रकारामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: