पत्रकार सोनवणे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या पत्रकार सुरक्षा समितीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी – ANC News
COVID - १९ बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending

पत्रकार सोनवणे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या पत्रकार सुरक्षा समितीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

सोनवणे कुटूंबियांना ५० लाखाची आर्थिक मदत द्या अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रकार सुरक्षा समिती....!

सोलापूर – दैनिक सकाळ चे पत्रकार विजयकुमार सोनवणे यांचे कोरोना संक्रमण काळात सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटल येथे निधन झाले असून, या दुःखद निधनामुळे पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्याकुटूंबावर फार मोठा आघात झाला असून पत्रकार सोनवणे अनेक वर्षा पासून पत्रकारिता करत होते. त्यांच्या निधनामुळे पत्रकारांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्या कुटूंबाला पन्नास लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने २७ जुलै रोजी मुख्यमंत्री यांना करण्यात आली होती. त्याच बरोबर आज पत्रकार सुरक्षा समिती ने कोरोना संक्रमण काळात निधन पावलेल्या पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्या कुटूंबाला राज्य सरकार कढून भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा उपाध्यक्ष इलियास शेख शहर उपाध्यक्ष प्रभाकर एडके सचिव अरुण सिडगिड्डी मोहोळ तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव प्रदीप पेंदापल्लीवार, बिपीन दिड्डी, अशोक निंबाळकर, हरीश पवार, दत्ता फाळके, अक्षय बबलाद प्रसाद ठक्का, रिझवान शेख विश्व्जीत कारंडे प्रदीप चव्हाण शब्बीर शेख, युनूस अत्तार सतीश गडकरी, बाबा काशीद अशोक माचण इस्माईल शेख दिगंबर इप्पलपल्ली, मुस्ताक शेख, ज्ञानेश्वर गवळी अमर पवार सदाशिव कपडेकर रियाज शेख भास्कर अल्ली लक्ष्मण गणपा इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: