पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान – ANC News
माझं सोलापूर
Trending

पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेले, पोलीस नाईक जाकीर हिदायतरसूल शेख यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाखाची मंजुरी

सोलापूर दि १५ : जिल्ह्यातील उत्कृष्ठ काम केलेल्या महसूल, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, कोरोना योद्धे, सामाजिक संस्था यांचाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेले पोलीस नाईक जाकीर हिदायतरसूल शेख यांच्या वारसांना शासनाकडून मंजूर ५० लाख आणि पोलीस महासंचालक यांच्या विशेष सहायता निधीतून १० लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते देण्यात आला.

सन्मानार्थी खालीलप्रमाणे

पोलीस दलात उत्कृष्ठ सेवा केल्याने पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्हप्राप्त- ग्रामीण- पोलीस निरीक्षक अरूण सावंत (स्थानिक गुन्हे शाखा), विश्वंभर गोल्डे (माळशिरस), सहायक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव (करमाळा), सहायक फौजदार नाशिर शेख (तालुका पोलीस ठाणे), हवालदार महेश क्षीरसागर (सुरक्षा शाखा), सुभाष राठोड (विशेष शाखा). शहर- पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, हवालदार उमाकांत कदम, संजय आवताडे, गजानन कणगेरी, मुनीरोद्दीन शेख, इमाम कासीम महेंदी, पोलीस नाईक धनाजी सुरवसे, संजय सावरे, मंजूनाथ मुत्तनवार, राहुल फुटाणे, पोलीस शिपाई श्रीमती श्रीदेवी म्हेत्रे.

महसूल विभाग- प्रांताधिकारी सचिन ढोले (पंढरपूर), तहसीलदार राजेश चव्हाण (माढा), नायब तहसीलदार तुषार देशमुख (माळशिरस), लघुलेखक प्रदीप शिंदे (जिल्हाधिकारी स्वीयसहायक), मंडल अधिकारी जे.आर. धनुरे (बोरामणी), अव्वल कारकून जे.डी. पवार (जिल्हाधिकारी कार्यालय), तलाठी श्रीमती ए.ए. जोरी (उत्तर सोलापूर तहसील), लिपीक टंकलेखक केतन राचमाले (जिल्हाधिकारी कार्यालय), वाहन चालक आर.एस. पालक (मोहोळ तहसील), पोलीस पाटील सचिन माने (कोंडबावी, ता. माळशिरस), कोतवाल विकास माने (लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा), शिपाई राजू आगळे (अपर जिल्हाधिकारी कार्यालय).

कोरोना काळात उत्कृष्ट कामकाज करणारे कोरोना योद्धे खालीलप्रमाणे

उपायुक्त धनराज पांडे, पंकज जावळे, अजय पवार (महानगरपालिका), उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए.एन. मस्के, विभाग प्रमुख डॉ. व्ही.एन. धडके (शासकीय रूग्णालय आणि महाविद्यालय), पोलीस नाईक महेश कांबळे, पोलीस शिपाई श्रीमती प्रियंका आखाडे, होमगार्ड गजानन स्वामी, विशाल वजाळे (ग्रामीण पोलीस), वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली शिरशेट्टी, आरोग्य निरीक्षक सचिन कदम, परिचर शिवम अलकुंटे, आशासेविका सरोजा वाघमारे, सफाई कामगार नागनाथ केशपागा, नागुबाई रातुल, झाडूवाली शिवबाई बनसोडे, स्मशानभूमी रखवालदार राजू डोलारे (महानगरपालिका)

वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पुरी, अधिपरिचारिका श्रीमती रुपाली पर्वतराव, वॉर्ड बॉय अंकुश क्षीरसागर, वॉर्ड कामगार सिता घंटे (जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय), वैद्यकीय अधिकारी डॉ.वृषाली पाटील, आरोग्यसेविका श्रीमती एस. एम. मठे, आशासेविका फरहान शेख, भागिरथी कुंभार, अॅम्ब्युलन्स वाहन चालक गणेश झुंझार( जिल्हा परिषद), नायब तहसीलदार प्रवीण घम, अव्वल कारकून चंद्रकांत हेडगिरे, लिपीक अजित कांबळे, सुशांत देशपांडे, विजय काकडे, शिपाई रमेश माळी, मोजणीदार समीर पाटील, लिपीक अतुल रणसुभे लिपीक प्रशांत माशाळकर, अव्वल कारकून राजू शेळके (जिल्हाधिकारी कार्यालय), लघुलेखक निम्नश्रेणी सागर लोंढे (जिल्हा कृषी कार्यालय), मंडल अधिकारी विजयकुमार जाधव (म्हैसगांव, कुर्डूवाडी), तलाठी विकास माळी (सांगोला), कोतवाल फिरोज सुतार (तळसंगी), श्रीमती कविता चव्हाण (टायगर ग्रुप ऑल इंडिया) आणि चंद्रिका चौहान (उद्योगवर्धिनी सामाजिक संस्था).

पोलीस आयुक्त कार्यालय-

हवालदार अशोक लोखंडे, पोलीस नाईक प्रवीण जाधव, अंबाजी कोळी, इम्रान शेख, पोलीस शिपाई मनीष जाधव, भीमराव काळे, संपत करबाळे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: