देश विदेशमहाराष्ट्र
Trending
उद्याच्या नागपंचमी पूजनाचे शुभ मुहूर्त
उद्या या वेळेतच नागदेवतांची पूजा संपन्न करा...!
नाग पंचमी २०२०: श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी दिवशी नाग पंचमी हा सण म्हणून साजरी केले जाते, ती या वेळी उद्या वार शनिवार रोजी २५ जुलै साजरी होणार आहे. या दिवशी नाग, सापांची अर्थात नागदेवतांची पूजा केली जाते. भविष्य पुराणात असे म्हटले आहे की, या दिवशी जर खऱ्या मनाने सर्पांना दूध दिले, तर प्रसन्न आणि सर्पदंश होण्याचा धोकाही कमी होतो. नाग पंचमीच्या दिवशी लोक घरात शेणापासून साप बनवून, त्याची पूजा करतात, तसेच या दिवशी एखाद्यास साप दिसला तर, तो अत्यंत शुभ मानला जातो. संपूर्ण देशात नाग पंचमी साजरी केली जाते. विशेषत: जिथे मोठी शिव मंदिरे आहेत आणि आदिवासी भागात हे अधिक आहे. चला तर मग जाणून घेऊया नाग पंचमीचा शुभ काळ.
पूजनाचे मुहूर्त :- नागपंचमी २५ जुलै २०२०
शुभ वेळ : पहाटे ५:४२ ते सकाळी ८:२४ पर्यंत