मोदी सरकारचा मोठा निर्णय – गेल्या ३४ वर्षा नंतरचा हा होतोय मोठा बदल, पहा काय आहे हे बदल….! ( Modi sarkarcha motha nirnay )
यापुढे दहावी आणि बारावीची परीक्षा नसेल, बोर्ड परीक्षा झाल्या रद्द...!
नवी दिल्ली :- २९ जुलै रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या (MSBSHSE SSC Result) दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result 2020) लागला, त्याच दिवशी दिल्लीत मोदी सरकारने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल (New National Education Policy 2020) करण्याचं घोषित केलं आहे. यापुढे दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा नसेल किंवा फारशी महत्त्वाची नसेल, असंच या शिक्षण सुधारणा धोरणातून स्पष्ट होतं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
गेली अनेक वर्षं अस्तित्वात असेलेली 10 + 2 म्हणजे दहावीपर्यंत शालेय आणि बारावीपर्यंत उच्च माध्यमिक वर्ग अशी रचना आता नसेल. त्याऐवजी 5 + 3 + 3 + 4 अशी नवी रचना अस्तित्वात येणार आहे.
याचा अर्थ पहिली पाच वर्षं प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक वर्ग, त्यानंतर प्राथमिक शिक्षण आणि पुढची तीन वर्षं माध्यमिक वर्ग अशी रचना असेल. शेवटची तीन वर्षं उच्च माध्यमिक वर्गाचं शिक्षण असेल.
ही नवी रचना ५ + ३ + ३ + ४ काय आहे ?
पूर्वप्राथमिकची ३ वर्षं अधिक पहिली आणि दुसरी – अशी ५
तिसरी ते पाचवी – प्राथमिक – अशी ३
सहावी ते आठवी – माध्यमिक – अशी ३
नववी ते बारावी – उच्च माध्यमिक – अशी ४
दहावीनंतर आता जसे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा शाखा निवडायच्या असतात, ते आता बारावीपर्यंत नसेल. सर्व विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत समान शिक्षणक्रम शिकवला जाईल. त्यामध्ये vocational म्हणजे प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारित व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिलं जाईल, अशी माहिती जावडेकर आणि पोखरियाल यांनी दिली.