मटका प्रकरणी दोषी फक्त नगरसेवक का..? – ANC News
माझं सोलापूर
Trending

मटका प्रकरणी दोषी फक्त नगरसेवक का..?

सोलापूर शहरात मटका नावाचा अवैध्य धंदा सुरूच आहे...!

सोलापूर शहरात मटका नावाचा अवैध्य धंदा तसा जुनाच आहे. त्यात अनेक राजकीय, सामाजिक, तथाकथित, पांढरपेक्षा पुढारी देखील सामील आहेत. त्याच बरोबर पोलीस खात्यामधील काही बांडगुळ देखील आहेत, हे आता जवळपास सिद्ध झालंय सर्वसामान्य माणसाच्या संसाराची राखरांगोळी करण्याऱ्या मटका वर कारवाई करण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी कधीच पुढाकार घेतलेला दिसत नाही. याला कारण म्हणजे या मटका बुकी चालक कधून मिळणारे लाखों रुपयांची मायारुपी हप्ते, शहरातील सात ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाय अनादी काळापासून सुरु असून, याची माहिती सर्व पोलीस निरीक्षक पासून वरिष्ठ अधिकारी यांना माहिती असते मग आताच मटका बुकीवर कारवाई चे नाटक का? कश्याला नाटक बाजी करतात, हे पोलीस अधिकारी शहरातील क्राईम ब्रँच का वेड्याचे सोंग घेत आहे. वर्षानुवर्षे हप्ते खाऊन आता कसली कारवाई करत आहेत? अशी कारवाई यापूर्वी का केली नाही याचा विचार करायला हवा…..
केवळ कागदावर कारवाई करण्यात येऊन, मटका पुन्हा सुरु केला जातोय हे नवीन नाही, खालून वरपर्यंत हप्ते दिल्याशिवाय कोणताही धंदा करता येतं नाही हे उघड असताना मग कारवाई का केली जात नाही याच उत्तर वरिष्ठ पोलीस अधिकारी देतील का?

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: