जर अशी भावना सोलापूरकरांची राहिली, तर नक्कीच कोरोना वर मात करू…..! – ANC News
माझं सोलापूर
Trending

जर अशी भावना सोलापूरकरांची राहिली, तर नक्कीच कोरोना वर मात करू…..!

कोविड-१९ मुळे यंदा गणेश विसर्जन नव्हे, तर गणेश संकलन....!

प्रतिनिधी – प्रसाद विभूते

सोलापूर – सोलापुरात १ सप्टेंबर रोजी अनंत चथुर्ती अर्थात गणेश विसर्जन हे सोलापूर महानगरपालिकेने दिलेल्या नियमात पार पडलं. यंदा कोविड-१९ मुळे सिद्धेश्वर तलाव आणि संभाजी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जन करण्यास सक्त मनाई केली होती. परंतु नागरिकांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून, गणेश विसर्जन ऐवजी गणेश संकलन ही संकल्पना आमलात आणली. याचे नियोजन अगदी काटेकोरपणे करून, शहरातील आठ विभाग विभागून, त्यात प्रत्येक विभागात जवळपास १५ ते २० संकलन केंद्र निवडून दिले होते. संकलन केंद्र म्हणून त्या त्या विभागातील मंगलकार्यालये, शाळा-महाविद्यालये, मनपा शाळा, मल्टिपर्पज हॉल अश्या ठिकाणी संकलन केंद्र नेमून दिले होते. महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी नेमून देण्यात आले होते. गणेश मूर्ती घेऊन आलेल्या नागरिकांचे नावे लिहून त्यांचे गणेश मूर्ती साठवून, २०० तर कधी ३०० अश्या संख्येने महानगरपालिकेच्या वाहनांमध्ये तळे हिप्परगे येथे नेण्यात आले.

एकंदरीत या संकलन केंद्रातून लाखोंच्या संख्येने गणेश मूर्ती तळे हिप्परगे येथे पाठविण्यात आले आणि तेथे नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात गणेश मूर्ती देऊन त्याचे विसर्जन करण्यात आले. या महानगरपालिकेच्या नव्या संकल्पनेला नवी उमीद मिळाली, नागरिकांनी प्रतिसाद देऊन एकोप्याचे दर्शन या गणेशोत्सवात दाखवून दिले, जर अशी भावना सोलापूरकरांची राहिली, तर नक्कीच कोरोना वर मात करू आणि कोरोना संपुर्णपणे संपुष्टात आणू. मोठ्या उत्साहाने नागरिकांनी गणेश संकलनात सहभाग घेत लाडक्या बाप्पाला निरोप देत “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….” असा जयघोष उद्गारले….!

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: