अरे बापरे…! बाजारात सोन्याचा भाव ५२००० रुपयांवर ( Gold prices hit a record high ) – ANC News
देश विदेशमहाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending

अरे बापरे…! बाजारात सोन्याचा भाव ५२००० रुपयांवर ( Gold prices hit a record high )

नागरिकांना सोने घेणे झाले आता अवघड, अन सराफांची होतीय अडचण...!

देशांतर्गत कमॉडिटी बाजारात आज मंगळवारी सोन्याच्या भावात ०.४ टक्के वाढ झाली आहे. सोने १३२ रुपयांनी वधारले आणि सोन्याचा भाव ५२३३२ रुपयांवर गेला आहे.

चांदी देखील महागली असून, त्यात १.८ टक्के वाढ झाली आहे. सध्या चांदीचा एक किलोचा भाव ६६७२६ रुपये झाला आहे. चांदीचा मागील आठ वर्षांत सर्वाधिक दर आहे. करोनाचा प्रकोप, अमेरिका-चीनमधील संघर्ष आणि आर्थिक अनिश्चितता या सर्व घडामोडी मुळे या ही रुपयांची अफलातफल सुरू आहे.

सोन्याचा भाव वाढीस पोषक ठरत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या महिनाभरात देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत प्रमुख शहरांतील सराफा बाजारपेठा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. सोन्याची तेजी ग्राहकांचे डोळे दिपवणारी असून, मागणीला फटका बसल्याचे सराफांचे म्हणणं आहे.

कमॉडिटी विश्लेषकांच्या मते नजीकच्या काळात सोन्याचा भाव ५२६६० ते ५२९०० च्या दरम्यान राहील. सोमवारी सोन्यात मोठी वृद्धी झाली होती. मुंबई, दिल्ली सह सोलापुरात सर्वात जास्त उच्चांक गाठला आहे.
▪️मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५०६६० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५१६६० रुपये आहे.
▪️दिल्लीत २२ कॅरेट सोने ५०८१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२०१० आहे.
▪️सोलापूर मध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९९६० रुपये असून २४ कॅरेटचा ५४३०० भाव आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: