सोलापूर मंगळवेढा 4 पदरी रस्त्याच्या कामाला वेग; 50 ते 55% काम पूर्ण (Solapur Manghalawedha Highway) – ANC News
महाराष्ट्रमाझं सोलापूरसंपादकीय
Trending

सोलापूर मंगळवेढा 4 पदरी रस्त्याच्या कामाला वेग; 50 ते 55% काम पूर्ण (Solapur Manghalawedha Highway)

DBL Manghalawedha Solapur Highway Private Limited. BHARAT MALA Scheme. DILIP BILDCON LIMITED (DBL). Aarvee Associates. Independent Engineer Services for four laning of Solapur to Sangli(package IV Mnagalwedha to Solapur) Section of NH-166 form existing Km 314+969 to Km 370+452(Design L km Ch km 321.600 to km 378+100) of length 56.500 km in the state of Maharashtra on Hybrid Annuity Mode

आज देशामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ते मार्ग हा देशाच्या अस्मितेचा अविभाज्य घटक असून रस्ते चांगले असतील तरच प्रवास चांगला होऊ शकतो आणि प्रवास चांगला झाला तर जनता समाधानी राहू शकते, परंतु असे चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्याची जबाबदारी ही रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदाराची असते. सरकारी अधिकारी कंत्राटदारांना काम देतात त्यानंतर वेळोवेळी जाऊन रस्त्याची पाहणी करतात, परंतु यामध्येही कंत्राटदार धोकेबाजी करतात. अशा कंत्राटदारांमुळे रस्त्यांची लवकरच दुर्दशा होण्यास सुरुवात होते.

आज आम्ही आपणाला एक अशी कंत्राटदार कंपनीची माहिती देणार आहोत ज्या कंपनीने आजवर देशभरात कित्येक किलोमीटरचे रस्ते अतिशय चांगल्या दर्जाचे व अधिक काळ टिकणारे तसेच देशातील जनतेच्या प्रवासामध्ये कोणताही अडथळा निर्माण न करणारे बनवलेले आहेत. या कंपनीचे नाव आहे DILIP BILDCON LIMITED (DBL). या कंपनीकडून सुरू असलेल्या एका रस्त्याच्या कामाचे ANC News च्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. ही पाहणी होती सोलापूर मंगळवेढा हायवे रोडची. या कामामध्ये काळाबाजार आहे का? रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे का? रस्त्यांच्या कामांमध्ये कंत्राटदार किंवा त्यांचे कामगार हे हलगर्जीपणा करत आहेत का? या ठिकाणी आजूबाजूच्या जनतेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे का? नैसर्गिक सौंदर्याला यांच्या कामामुळे धोका निर्माण होत आहे का? अशा विविध गोष्टींची पाहणी ANC News च्या माध्यमातून करण्यात आली. हे काम पाहणाऱ्या कंपनीच्या विविध अधिकाऱ्यांसोबत बातचीत करण्यात आली तसेच कामगारांशीदेखील चर्चा करण्यात आली. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन आज आम्ही आपणाला या रस्त्याच्या कामाची काही माहिती देणार आहोत.

Solapur Mangalwedha Highway

  सर्वप्रथम हे जाणणे गरजेचे आहे कि या प्रोजेक्टचे नाव काय आहे. तर या प्रोजेक्ट चे नाव Independent Engineer Services for four laning of Solapur to Sangli(package IV Mnagalwedha to Solapur) Section of NH-166 form existing Km 314+969 to Km 370+452(Design L km Ch km 321.600 to km 378+100) of length 56.500 km in the state of Maharashtra on Hybrid Annuity Mode असे आहे. प्रोजेक्ट नॅशनल हायवे नंबर 166 चा आहे. म्हणजे सोलापूर मंगळवेढा हा नॅशनल हायवे 166 आहे. हा प्रोजेक्ट ‘BHARAT MALA’ या स्कीम अंतर्गत काम करत आहे. हा रस्ता संपूर्ण चार पदरी असून या रस्त्याची लांबी एकूण 56.500 Km आहे. हा संपूर्ण प्रोजेक्ट एकूण 1141.00 Crore रुपयांचा आहे. या रस्त्यामध्ये दोन मोठे ब्रिज आहेत एक भीमा नदीवरील पूल तर दुसरा सीना नदीवरील पूल. रस्ता पूर्ण झाल्यानंतर इंचगाव याठिकाणी टोल प्लाझा उभारण्यात येणार आहे. या रोडचे DPR Consultant हे Aarvee Associates आहेत तर या रस्त्याच्या कामासाठी IIFCL आणि PNB या दोन बँकेकडून लोन घेण्यात आलेले आहे. DBL Manghalawedha Solapur Highway Private Limited यांना हा प्रोजेक्ट 27 मार्च 2018 रोजी मंजूर झाला होता. या कामाची सुरुवात 23 मे 2019 रोजी सुरू झाली. हे काम 730 दिवसांमध्ये पूर्ण व्हायला हवे असे कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केलेले आहे. त्यानुसार 22 मे 2021 रोजी हे काम पूर्ण व्हायला पाहिजे. काम पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षांपर्यंत या रस्त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी ही DBL कंपनीकडेच राहणार आहे. कामाच्या पहाणीमध्ये ANC News च्या असे लक्षात आले की आत्तापर्यंत एक वर्षाच्या कालावधीमध्ये या कामाचा जवळपास 50 ते 55 % भाग हा अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेला आहे. राहिलेला भाग दिलेल्या वेळेत ते नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास देखील आहे.

solapur mangalawedha highway bridge construction

अशा रोड कंत्राटदार कंपनीची आज देशाला गरज आहे. कारण अशा कंपन्यांमुळे आपल्या देशातील मोठ्या रस्त्यांचा दर्जा हा अधिक वाढेल व सर्व भारतीय जनतेचा प्रवास हा सुखकर होईल यात शंका नाही. या रस्त्याच्या बांधकामामध्ये विविध अडचणी DBL कंपनीला आल्या, परंतु या कंपनीने कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा कामांमध्ये न करता सर्व अडचणींवर मात करून आपले काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये जनतेला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची सर्व जबाबदारी कंपनीच्या माध्यमातून वेळोवेळी घेतली जाते. त्यामुळे आम्ही ANC News च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील या रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना आवाहन करीत आहोत की, हा रस्ता आपल्यासाठीच तयार होत आहे, त्यामुळे या कंपनीच्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना आपण वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे. जेणेकरून यांचे काम अधिक चांगल्या दर्जाचे होईल आणि आपल्या प्रवासामध्ये कोणत्याही पद्धतीचा अडथळा भविष्यामध्ये येणार नाही व आपला प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल.

आज सोलापूर तुळजापूर हायवे जो आपण प्रवास करत आहोत तो हायवे देखील याच DBL कंपनीने बनविला आहे. या रस्त्याची काही छायाचित्र आम्ही आपणासमोर प्रदर्शित करीत आहोत. कारण या रस्त्यामुळे सर्वांचा सोलापूर ते तुळजापूर प्रवास हा अतिशय वेगाचा आणि सुखकर प्रवास झाला आहे. या छायाचित्रांना पाहिल्यानंतर असे वाटते की हे कुठल्यातरी बाहेरील देशाचे रस्ते आहेत, परंतु तसे नसून हे आपले भारतीय रस्ते आणि अभिमानाची गोष्ट सांगायचे म्हणजे हा सोलापूर तुळजापूर हायवे रस्ता आहे.

Solapur Tuljapur Highway bridgh

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: