राम गायकवाड ला अटक करा अन्यथा तीव्र निदर्शने होतील; भीम आर्मी चा आक्रमक पवित्रा – ANC News
महाराष्ट्र
Trending

राम गायकवाड ला अटक करा अन्यथा तीव्र निदर्शने होतील; भीम आर्मी चा आक्रमक पवित्रा

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील राम गायकवाड या इसमाने सोशल मीडियाचा माध्यमातून
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे केले असून अनुसूचित जाती व जमाती अत्त्याचार प्रतिबंध कायदा सन १९८९ अंतर्गत अॅट्रोसिटी हा गुन्हा दाखल करण्यात यावी यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन च्यावतीने ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आज निवेदन देण्यात आले जर येत्या ८ दिवसात जर राम गायकवाड यास अटक न झाल्यास सोलापूर जिल्ह्यातून सर्वत्र तीव्र निदर्शने होतील असा इशारा भीम आर्मी सोलापूर जिल्हाध्यक्ष ऍड अखिल शाक्य यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे .
यावेळी भीम आर्मी सोलापूर जिल्हाध्यक्ष ऍड अखिल शाक्य , जिल्हामहासाचिव दर्शना गायकवाड , युवा जिल्हाध्यक्ष अमर पवार , शहर अध्यक्ष मनोज चलवादी , युवा शहर अध्यक्ष मनोज गोडवे , निशांत सिद्धगणेश , महेश चलवादी आदी उपस्थित होते.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: