माझं सोलापूर
हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली पाहीजे; भीम आर्मीने दिला आंदोलनाचा इशारा

सोलापूर रिपोर्टर
दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे निवासस्थान राजगृहावर ज्या माथे फिरुनी हल्ला केला त्या माथे फिरुला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन भीम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
आरोपी २४ तासाच्या आता अटक करण्यात यावी अन्यथा
भीम आर्मी भारत एकता मिशन सोलापूर संघटनेच्या वतीने सोलापूर मध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत
असा आव्हान आणि इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र राज्य संघटक डॉ.किर्तीपाल गायकवाड जिल्हाध्यक्ष ॲड.अखिल शाक्य यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा महासचिव
दर्शना गायकवाड जिल्हा युवा अध्यक्ष अमर पवार , शहर सचिव विशाखा ताई , शहर सरचिटणीस अजय मैंदर्गीकर महेश चलवादी आदी उपस्थित होते .