भारताचे माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांचे ८४ व्या वर्षी निधन….! Pranav mukherjee news in marathi
भारतीय राजकारणाचे प्रख्यात व्यक्तिमत्त्व प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला.....!

भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतीय राजकारणातील ज्येष्ठव्यक्तिमत्त्व प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. बराच काळ त्यांनी राजकारणात घालविला होता, भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांची विशेष ओळख होती. कालपर्यन्त आपल्यात असणारे राजकीय व्यक्तिमत्त्व आज मात्र नाहिसे झाले, काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांनी राजकीय सामाजिक बांधिलकी जपत काम करत आज पर्यंत निष्ठेने वावरले. त्यांची ही ख्याती त्यांची आठवण साठवण करून आज प्रत्येक राजकीय नेते कार्यकर्ते मनात ऋजुकरून घेतले आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतीय राजकारणाचे प्रख्यात व्यक्तिमत्त्व प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. आर्मी रूग्णालयात उपचारासाठी गेल्यावर त्यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. हॉस्पिटलमध्ये १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट कायम ठेवण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती क्रिटिकल असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर प्रणव मुखर्जी दीर्घ कोमात गेल्याच हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. आणि अखेर ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी झाला. प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द पाच दशकांपर्यंत विस्तारली गेली, त्यातील सर्वात मोठे पद म्हणजे जेव्हा ते भारताचे राष्ट्रपती झाले. २०१२ ते २०१७ पर्यंत ते राष्ट्रपती पदावर होते. परंतु राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच एकापेक्षा जास्त प्रसंगी प्रणव मुखर्जी हे भारत सरकारचा कणा होते.
त्यांच्या राजकीय प्रवासाला १९९६ मध्ये सुरुवात झाली. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांना पहिल्यांदा राज्यसभेचे खासदारकीचे तिकीट मिळाले. पुढे त्यांचा केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात १९९३ मध्ये समावेश करण्यात आला. १९८० ते १९८५ दरम्यान ते राज्यसभेतील लीडर ऑफ हाऊस होते. एके काळी त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष देखील स्थापन केला होता. परंतु, १९८९ मध्ये हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. १९९१ मध्ये त्यांची नियुक्ती नियोजन आयोगाच्या प्रमुखपदी करण्यात आली. २००४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले. ते २००९ ते २०१२ दरम्यान- अर्थमंत्री, २००४ ते २००६ दरम्यान – संरक्षणमंत्री २००६ ते २००९ दरम्यान – परराष्ट्र व्यवहार मंत्री होते.
प्रणव मुखर्जी हे कट्टर कॉंग्रेसचे नेते होते. परंतु यामुळे एनडीएच्या कारकिर्दीच्या काळात त्यांना त्याच्या कर्तव्यापासून रोखले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे जे मार्गदर्शन केले त्याबद्दल वारंवार कृतज्ञता व्यक्त केली आहे.
प्रणव मुखर्जी यांना २००८ मध्ये पद्मविभूषण आणि २०१९ मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आले.