अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते, तर प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्रीना भूमिपूजन सोहळ्याचे आमंत्रण….! ( ayodhyat bhumipujan honar pm narendra modi yanchya haste )
२०० लोकांमध्येच होणार भूमिपूजन, सोशल डिस्टसिंगचे पालन होणार...!
अयोद्धामधील राम मंदिराचे निकाल लागल्यानंतर मंदिराच्या उभारणीच्या कामाला वेग आला होता. आता येणाऱ्या ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोद्धेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान या सोहळ्याला देशातील सार्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण केलेले असून, हे कार्यक्रम कमी वेळात पार पडणार आहे, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवले जाईल. २०० पेक्षा अधिक लोक या भूमिपूजनाला नसतील आणि त्यामध्येही केवळ १५० हे आमंत्रित असतील अशी माहिती गिरी यांनी दिली आहे. ५ ऑगस्ट दिवशी राम मंदिराच्या भूमीपुजनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोद्धेमध्ये हनुमान गढीच पूजन करून, त्यानंतर राम लल्लांचं पूजन करून या तिर्थक्षेत्राचे दर्शन घेणार आहेत.