पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न…! ( ayodhya ram mandir bhumipoojan )
चांदीची वीट रचून मोदींजीनी केली, रामजन्मभूमीची पायाभरणी...!
आयोध्या :- संपूर्ण भारत ज्या दिवसाकडे डोळे लावून बसला होता , अखेर तो ऐतिहासिक दिवस आज उजाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या नगरीत राम लल्लाच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न सोहळा.
१७५ निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मंत्रांच्या उद्घोषात नरेंद्र मोदीच्या हस्ते रचली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन, यथासांग पूजा करण्यात आली. मुख्य भूमिपूजनाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी पंडितांच्या मंत्रोच्चाराच्या गजरात कलशाचे पूजन करण्यात आले.
राम मंदिरासाठी ९ शिळांचं मोदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर चांदीची वीट रचून मोदींनी रामजन्मभूमीची पायाभरणी केली. या पायाभरणीसाठी देशभरातून २ लाख ७५ हजार वीटा आल्या. त्यातील निवडक १०० वीटा राममंदिराच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणार आहे. संपूर्ण भारत भर राम जय जय राम चा नारा घुमला, आणि अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली. हा ऐतिहासिक सोहळा तर, सुवर्ण अक्षरात लिहावा असा संपन्न झाला.