आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ १०२ नागरिकांनी घेतला ( Health check-up camp )
सोलापुरात आरोग्य तपासणी शिबिर पार पडला....!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सोलापूर शहर (अशोक नगर) व फॅमिली प्लॅंनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २९ जुलै रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील १०२ नागरिकांनी लाभ घेतला. अशोक चौकातील पाथरुट चौक येथील मुदगल बागेत हे शिबिर घेण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. तसेच नुकताच झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशाप्रसंगी किरकोळ आजारांवर देखील उपचार करून घेणे नागरिकांना अशक्य झाले आहे. या कठीण प्रसंगी अशा आरोग्य तपासणी शिबिरांचा नागरिकांना आधार मिळत आहे. वेगवेगळ्या भागात घेण्यात येत असलेल्या शिबिरांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
या शिबिराला शहर कार्यवाह शिवानंद कल्लूरकर, शहर प्रचारक सचिन पुरोहित, सेवा प्रमुख सुनिल भराडकर, फॅमिली प्लॅंनिंगचे व्यंकटेश कंची, नगर सहकार्यवाह श्रीधर आरगोंडा, नगर कार्यकर्ते विकास धोत्रे, वस्तीविकास प्रमुख श्रीनिवास कोडम, तेजस मुद्दे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिराला प्रभाग क्र. १३ चे नगरसेवक सुनिल भाऊ कामाठी, नगरसेविका प्रतिभा मुदगल, सुनिल मुदगल, अंबादास अमृतम आदींनी भेट दिली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अजय धोत्रे, शेखर मुदगल, सचिन धोत्रे, आशिष पवार, राहुल दिपक मुदगल, बजरंग देवकर, अभिजित मुदगल, विशाल अलकुंटे, अमित धोत्रे, सोन्या मुदगल, गणेश मुदगल, नितीन धोत्रे, अक्षय यमपुरेआदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.