ANC News DIGITAL Events आयोजित राज्यस्तरीय डिजिटल एकपात्री अभिनय स्पर्धा 2020 चा निकाल जाहीर
प्रथम क्रमांक कु. शर्वरी स्वामी, द्वितीय क्रमांक कु. प्राची कोंतम, तृतीय क्रमांक कु. देवांश क्षीरसागर...

ANC News DIGITAL Events आयोजित
राज्यस्तरीय डिजिटल एकपात्री अभिनय स्पर्धा 2020
सोलापूर – ( प्रतिनिधी – प्रसाद विभूते )
ही स्पर्धा ANC News कडून ऑनलाईन घेण्यात आली होती. लॉकडाऊन काळात सर्वजण घरीच बसून होते, कलाकार हा कधीच शांत बसू शकत नाही, म्हणून आम्ही कलाकारांचा विचार करून ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यांना आपली कला सादर करण्या करिता आम्ही हे DITGITAL (online) रंगमंच खुले करून दिले होते. याला कलाकारांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. अगदी काही कलाकारांच्या पालकांना हे कळलं की, आपल्या पाल्यात अभिनय ही कला देखील आहे. असे नमूद करत पालकांनी आमच्या पर्यन्त आपल्या पल्याचे व्हिडिओ पोहचविले.
आज या स्पर्धेचा निकाल आम्ही जाहीर करीत आहोत, या स्पर्धेतील निकाल हा दिलेल्या नियमानुसारच आम्ही जाहीर करीत आहोत. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. शर्वरी स्वामी हिने पटकावला आहे, तर द्वितीय क्रमांक कु. प्राची कोंतम हिने पटकावला आणि तृतीय क्रमांक कु. देवांश क्षीरसागर याने पटकावला आहे.
ANC NEWS चे मुख्य संपादक श्री. हरीश पवार सर यांनी पूर्ण ANC NEWS परिवाराकडून आणि ANC NEWS च्या दर्शकाकडून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच सर्व सहभागी कलाकारांचे आभार मानले व त्यांच्या कलेला दाद देत त्याच्या कलेचे कौतुक केले. ते म्हणाले ही स्पर्धा होती परंतु या कडे हार जित असे न पाहता, आपली कला आपण कला प्रेमींपर्यंत पोहचविली आहे आणि हीच गोष्ट एका कलाकारांसाठी महत्वाची असते, त्यामुळे ज्यांचे नंबर आले अथवा नाही आले, त्यांनी नाराज न होता अजून जोमाने आपली कला सादर करा, म्हणजे अजून तुमची कला बहरत जाईल, मग नक्की तुम्ही ही यशाच्या शिखरावर असाल. एवढे सांगून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ANC NEWS चे हे रंगमंच कलाकारांसाठी असून, सदैव कलाकारांच्या सेवेत हे रंगमंच खुले असेल. असे ANC NEWS चे मुख्य संपादक म्हणाले.