अखेर आयपीएल टी-२० घेण्याचे झाले निश्चित..! पहा कुठे होणार यंदाचा आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा – २०२० ( IPL T-20 – 2020 ) – ANC News
क्रीडा व मनोरंजनदेश विदेश
Trending

अखेर आयपीएल टी-२० घेण्याचे झाले निश्चित..! पहा कुठे होणार यंदाचा आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा – २०२० ( IPL T-20 – 2020 )

आयपीएल होणार तर, क्रिकेट प्रेमींची उत्सुकता वाढली...!

 

 

 

नवी दिल्ली : आशिया कप आणि टी २० विश्वचषक स्पर्धा झाल्या, पण आयपीएल २०२० (IPL 2020) यंदा होणार की नाही, जर झालीच तर कुठे होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. पण क्रिकेट प्रेमींनो तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे की, २०२० मधली आयपीएल २० होणार आहे. आयपीएलच मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र ही स्पर्धा भारतात होणार की भारताबाहेर, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे चेयरमन बृजेश पटेल यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. आयपीएल २०२० यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचं पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितलं. मात्र या स्पर्धेची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचं ते म्हणाले.

पुढील आठवड्यात आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होईल आणि त्यामध्ये स्पर्धेच्या तारखा आणि संचालनाची प्रक्रिया निश्चित केली जाईल, पण साधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यादारम्यान होणार असल्याचे पटेल यांनी जाहीर केले आहे.

भारत सरकारने परवानगी दिल्यानंतर आयपीएल २०२० चं वेळापत्रक तयार करण्यात येईल, २८ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचं आयोजन करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र याबद्दलचं वृत्त पटेल यांनी फेटाळून लावलं. त्यांनी फक्त कोणत्या महिन्यात होणार आहे याची माहिती दिली होती. पण गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीनंतर वेळापत्रक निश्चित करण्यात येईल, असं ते म्हणाले. यूएईनं आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. आता लवकरच त्यांना स्पर्धेच्या तारखा आणि पूर्ण वेळापत्रक देण्यात येणार आहे.

यूएईकडून आयपीएलची तयारी सुरू झाली.
यूएईनं आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आयपीएल डोळ्यासमोर ठेवून सुविधांची तयारी करत असल्याची माहिती दुबई स्पोर्ट्स सिटीचे हेड ऑफ क्रिकेट इव्हेंट्स सलमान हनीफ यांनी दिली होती. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज झाला आहे.

 

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: