ॲड. संजय सावंत (पाटील) यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडी च्या जिल्हाअध्यक्ष पदी निवड…! – ANC News
महाराष्ट्र
Trending

ॲड. संजय सावंत (पाटील) यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडी च्या जिल्हाअध्यक्ष पदी निवड…!

पार्टीने जिल्हा कमिटी मध्ये दखल घेऊन, त्यांना कायदा आघाडीची जिल्हाअध्यक्ष पदाची जबाबदारी ही सावंत यांना दिली...!

पुणे जिल्हा (ग्रामीण) भाजपाची कार्यकारिणी आज दि १७ आँगस्ट बावधन, तालुका मुळशी याठिकाणी जाहीर करण्यात आली असुन, विधानसभा २०१९ निवडणूकीत भारतीय जनता पार्टी मध्ये ॲड. संजय दत्ताञय सावंत (पाटील) यांनी प्रवेश केला होता, तसेच पार्टीमध्ये सर्कीय कार्यक्रर्ता म्हणून काम करत होते. पार्टीने जिल्हा कमिटी मध्ये दखल घेऊन त्यांना कायदा आघाडीची जिल्हाअध्यक्ष हि जबाबदारी दिली आहे.
ॲड. संजय दत्ताञय सावंत (पाटील) हे अनेक सामाजिक संस्था व संघटना भारतीय मिडीया फाऊंडेशन, अँन्टि करप्शन कमिटी, शिवक्रांती युवा परिषद, माहिती सेवा समिती मध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेश कमिटी मध्ये गेल्या १५ वर्षापासुन सामाजिक कामात सर्कीय आहे, तसेच राजकीय दृष्ट्या पाहिले तर आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश माजी सहसचिव म्हणून तसेच इंडियन ओसनिक पार्टी महाराष्ट्र माजी प्रदेश अध्यक्ष म्हणून सुध्दा काम पाहिले आहे.
पुणे जिल्हा (ग्रामीण) भाजपाची कार्यकारिणी आज बावधन, तालुका मुळशी याठिकाणी जाहीर करण्यात आली. प्रमुख कार्यकारीणी, मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस तसेच आघाड्यांचे संयोजक व सहसंयोजक, जिल्हा कार्यकारणी सदस्य, विशेष निमंत्रित इत्यादी नियुक्तीपत्र देण्यात आली.
याप्रसंगी पुण्यनगरी चे खासदार माजी पालकमंत्री माननीय गिरीश बापट साहेब, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, आमदार राहुलदादा कुल, आमदार भीमरावअण्णा तापकीर, माजी आमदार शरदभाऊ ढमाले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे, जिल्ह्याचे प्रभारी योगेशजी गोगावले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमात शारीरिक अंतर पाळले गेले, तसेच मास्क, सॅनिटायझर इत्यादींचा वापर करण्यात आला.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: