नागठाणा घटनेप्रसंगी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.विजय जंगम यांचे गृहमंत्री अनिल देशमुख याना निवेदन – ANC News
महाराष्ट्र
Trending

नागठाणा घटनेप्रसंगी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.विजय जंगम यांचे गृहमंत्री अनिल देशमुख याना निवेदन

नांदेड 24 मे 2020 : नांदेड जिल्ह्यातील उमरी नागठाणा येथील वीरशैव लिंगायत समाजातील शिवाचार्य यांच्या हत्येतील आरोपीस कठोर शिक्षा देऊन तातडीने महाराष्ट्रातील सर्व वीरशैव लिंगायत मठ संस्थानाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.विजय जंगम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कडे केली आहे.

      नांदेड जिल्ह्यातील नागठाण ( उमरी तालुका ) येथील वीरशैव लिंगायत मठातील शिवाचार्य यांची निघृण हत्या झाली . या प्रकरणी आरोपीस अटक करुण फाशीची शिक्षा दावी तसेच या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करूण या घटनेमागचा हेतू शोधावा . देशात व राज्यात साधू संत सुरक्षित राहीलेले नाही त्यांच्यावर जिवघेणे हल्ले व हत्या होत आहेत . या बाबतीत केंद्र व राज्यसरकारने साधू संत संरक्षण कायदा हा कायदा स्वतंत्र तयार संरक्षण कायद्दाची रचना करावी . करून तातडीने आमलात आणावा . तात्काळ महाराष्ट्रातील तमाम विरशैव लिंगायत मठ संस्थानला पोलिस संरक्षण देण्यात यावे महोदय , अलीकडच्या काळात हिंदू धर्मातील साधू संताच्या हत्येचे प्रकार अधिक प्रमाणात वाढत आहेत पालघर घटना ताजी असतानाच नांदेड जिल्ह्यातील नागठाण येथील वीरशैव लिंगायत मठ संस्थानचे मठाधिपती श्री.ष.ब्र . १०८ बाल तपस्वी निर्वाण रूद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांची दिनांक २४ मे रोजी पहाटे २ च्या सुमारास मठातील महाराजांच्या खोलित एका माथेफिरूने गळा दाबून निघृण हत्या केली . मठातील नगद रोकड आणि काही सोन्या चांदीचे पूजेचे सामान चोरून नेण्याचा प्रयत्न झाला . हत्येनंतर महाराजांचा मृतदेह त्यांचेच गाडीच्या डिकीत टाकुन घेउन जाण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला . या मागे चोरीचा हेतू आहे का किंवा अन्य काही कारण ? शासनामार्फत शोधावे . बाल तपस्वी निर्वाण रूद्र पशूपती महाराज यांचा उमरी तालुक्यात खूप मोठा शिष्य वर्ग आहे . मठ संस्थान कडून अन्न छत्र , गोशाळा चालवली जाते , धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमातून महाराजांनी अल्पावधीत मठाचा विकास केला आहे . या हत्ये मुळे प्रत्येक वीरशैव बाधंवाना एकच वाटत आहे . सध्या कोणत्याही संप्रदायातील संत व त्यांचे मठ सुरक्षित राहिले नाहीत . अशा अनेक घटनेतील आरोपींना संतांचा द्वेष का असावा … ? नागठाण येथिल या घटनेतील आरोपीस तातडीने शोधून सदर आरोपीस फाशिची शिक्षा देण्यात यावी . उच्चस्तरीय चौकशी व्हावी . या प्रकरणात योग्य ती चौकशी न झाल्यास अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल .या घटनेमुळे राज्यातील तमाम वीरशैव लिंगायत समाजात संतापाची लाट आहे . भावना अनावर होत आहेत . आणी या पुढे साधू संतांवर असे जीवघेणे हल्ले होणार नाहीत या करीता आपण राज्यात साधू संत संरक्षण कायदा अमलात आणावा अशी मागणी महासंघाने केली आहे.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: