उद्या दि १६ जुलै राज्यात बारावीचा निकाल होणार जाहीर ( 12th bord exam result ) – ANC News
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
Trending

उद्या दि १६ जुलै राज्यात बारावीचा निकाल होणार जाहीर ( 12th bord exam result )

maharesult 2020 |12th board result 2020 | How to see 12 Board exam result | Where to see12th board exam result | links to see 12 th board exam results

महाराष्ट्र राज्यात बारावी बोर्डाचा निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी जाहीर होणार आहे. यंदा कोरोना संकटकाळात राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यास उशिर झाला आहे. मात्र मंडळाने यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांचा निकाल लावण्याचा प्रयत्न होता. त्यानुुसार आज मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार १६ जुलै रोजी दुपारी १:०० वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट सोबत थर्ड पार्टी वेबसाईट्सवरही विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.

*१२ वीचा निकाल ऑनलाईन कसा पाहता येईल ?*

▪️mahresult.nic.in ही वेबसाईट ओपन करा.
▪️अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
▪️त्यानंतर HSC Examination Result 2020 वर क्लिक करा.
▪️आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडिरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करायचं आहे. त्यापुढे View Result वर क्लिक करा.
▪️तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.

*महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स:*
mahresult.nic.in

maharashtraeducation.com

results.mkcl.org

mahahsscboard.maharashtra.gov.in

mahahsscboard.in
—————————————————-

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: