राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीमधील बदल रद्द करण्यासाठी सोलापूर भीम आर्मी कडून मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन

प्रतिनिधी
सोलापूर 17 मे 2020 : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 5 मे 2020 रोजीच्या शासकीय ठरावाद्वारे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या विशेष अभ्यासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
या शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांसाठी या नव्या सुधारणांमध्ये 6 लाखांची सक्ती करण्यात आली आहे. हे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय अन्यायकारक आहे आणि हे अनुसूचित जाती आणि जमातींना सुविधा पुरवित असल्यामुळे ते भारतीय विविधानाच्या नियमांनुसार पूर्णपणे विसंगत आणि विरोधी आहे आणि ही दुरुस्ती त्वरित रद्द करण्याची गरज आहे.
तथापि, माननीय महोदय, या निवेदनात, आम्ही तुम्हाला राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील 5 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार लागू केलेल्या गुन्हेगारी अट रद्द करण्यात यावी यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन सामाजिक संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ऍड अखील शाक्य यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी क्रीमीलेअरची अट रद्द करण्यात यावी यासाठी मा.मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे व सामाजिक न्याय मंत्री मा.धनंजय जी मुंडे यांना email द्वारे निवेदन करण्यात आले आहे..जर असे नाही झाल्यास
भीम आर्मी भारत एकता मिशन सोलापूरआणि आझाद समाज पार्टी महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर संख्यात्मक आंदोलन करेल अस इशारा ऍड अखील शाक्य यांनी दिला