बारावीच्या निकालात सोलापूर पेक्षा पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी होते जास्त परंतु, सोलापूरनेच बाजी मारली ( 12 th bord exam news – pune bord )
पुन्हा सोलापूरची हवा राज्यात, 12 वी बोर्डात अव्वल कामगिरी
सोलापूर : इयत्ता बारावीच्या निकालात पुणे विभागात सोलापुर विभागाने बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी सोलापुरचा निकाल ९३.७४ टक्के लागला असून, त्याखालोखाल ९२.२४ टक्के निकाल हा पुणे जिल्ह्याचा आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील ९१.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात एकुण २ लाख ४० हजार ६९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ लाख २२ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागामध्ये सर्वाधिक १ लाख ४ हजार ८४४ विद्यार्थी विज्ञान शाखेतील असून, ९७.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला असून, ८३.१३ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. तर वाणिज्य शाखेतील ९२.९३ टक्के यश मिळवले तसेच व्यावसायिक शाखेतील ८८.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शाखानिहाय निकालतही सोलापुर जिल्हा हे आघाडीवर राहून आपली पुन्हा एकदा वेगळेच छाप दर्शविली आहे. विभागातील २७ हजार ९७४ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी तर ९५ हजार १२८ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे.
पुणे विभागाचा निकाल
परीक्षा दिलेल उत्तीर्ण टक्केवारी
पुणे १,२३,६५५ १,१४,०५६ ९२.२४
अहमदनगर ६३,५१३ ५८,४१२ ९१.९७
सोलापुर ५३,५२९ ५०,१७८ ९३.७४
एकुण २४०६९७ २२२६४६ ९२.५०
विभागाचा शाखानिहाय निकाल
शाखा परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारी
विज्ञान १,०४,८४४ १,०२,६६० ९७.९२
कला ६०,३८७ ५०,२०० ८३.१३
वाणिज्य ६७,१९२ ६२,४४० ९२.९३
व्यावसायिक ८,२७४ ७,३४६ ८८.७८