सिद्धेश्वर नगरी या संकटातून केव्हा सुटेल ? सोलापूरमध्ये 20 नवे कोरोना रुग्ण; कोणत्या परिसरातील ते पहा…
सोलापूर मध्ये वाढणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सोलापूरकरांमध्ये आज चिंतेचे वातावरण दिसत आहे. प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी विविध नियम सोलापूरकरांसाठी तयार केले जातात, परंतु एवढ्या प्रयत्नानंतरही सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग थांबण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार हे चित्र जणू दिवसेंदिवस मिळणाऱ्या आकडेवारीवरून दिसत आहे.

सोलापूर 9 मे 2020 : सोलापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेल की नाही हा प्रश्न जणू आज सोलापूरकरांना भेडसावत आहे. सोलापूर मध्ये आज पुन्हा 20 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज एकूण 175 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 155 अहवाल निगेटिव्ह आढळले असून 20 अहवाल हे पॉझिटिव आढळलेले आहेत. या 20 अहवालांमध्ये 12 जण पुरुष तर 8 स्त्रिया आहेत. रुग्णालयातून आज एकही जण बरा होऊन घरी गेलेला नसून केगाव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मधून 18 व्यक्तींना आज मुक्त करण्यात आलेले आहे. सोलापूर मध्ये वाढणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सोलापूरकरांमध्ये आज चिंतेचे वातावरण दिसत आहे. प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी विविध नियम सोलापूरकरांसाठी तयार केले जातात, परंतु एवढ्या प्रयत्नानंतरही सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग थांबण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार हे चित्र जणू दिवसेंदिवस मिळणाऱ्या आकडेवारीवरून दिसत आहे.
सोलापूर मध्ये आज 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, ते कोणत्या परिसरातील आहेत याची माहिती पुढील प्रमाणे :- शास्त्रीनगर – तीन पुरुष तीन स्त्रिया, कुमठा नाका – दोन पुरुष, नई जिंदगी – एक पुरुष, अशोक चौक – एक स्त्री, एकता नगर – दोन स्त्रिया, नीलम नगर एक पुरुष व एक स्त्री, केशवनगर – एक पुरुष, मनोरमा नगर विजापूर रोड – एक पुरुष, सदर बाजार लष्कर – एक पुरुष, लष्कर कुंभार गल्ली – एक पुरुष, साई बाबा चौक – एक पुरुष आणि बापुजी नगर – एक स्त्री. अशोक चौक परिसरातील स्त्रीचे सारी या आजारामुळे निधन झाले आहे.
पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत एकूण 216 अहवाल हे पॉझिटिव आढळलेले आहेत त्यामध्ये 123 पुरुष तर 93 स्त्रीया आहेत. आजपर्यंत एकूण 14 रुग्णांचे निधन झाले असून त्यामध्ये 6 पुरुष व 8 स्त्रिया आहेत. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 173 असून यामध्ये 97 पुरुष व 76 स्त्रिया आहेत. आजवर रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बधितांची संख्या ही 29 आहे.
आज ज्या व्यक्तीचे निधन झाले ती व्यक्ती अशोक चौक परिसरातील 48 वर्षाची महिला असून 7 मे 2020 रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे 7 मे 2020 रोजी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी निधन झाले. त्यांचा covid-19 रिझल्ट आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर मध्ये कोणकोणत्या उपाययोजना अवलंबल्या पाहिजेत या बद्दलचे तुमचे विचार आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून आपले विचार सोलापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे पोहोचतील.