सोलापुरात 11 मे ला 11 पॉसिटीव्ह; कसा होणार कोरोना सोलापुरातून कायमचा निगेटिव्ह??? – ANC News
COVID - १९ बातम्यामाझं सोलापूर
Trending

सोलापुरात 11 मे ला 11 पॉसिटीव्ह; कसा होणार कोरोना सोलापुरातून कायमचा निगेटिव्ह???

सोलापूर मध्ये काही केल्या कोरोनाची बॅटिंग अजूनही संपत नसल्यासारखे दिसत आहे. कोरोना विषाणू दिवसेंदिवस रण वाढवतच चालला आहे. सोलापूरमध्ये आज नवे 11 रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह, त्यापैकी बाधित असलेल्या 3 रुग्णांचा अहवाल त्यांच्या निधनानंतर प्राप्त.

सोलापूर 11 मे 2020 : सोलापूर मध्ये काही केल्या कोरोनाची बॅटिंग अजूनही संपत नसल्यासारखे दिसत आहे. कोरोना विषाणू दिवसेंदिवस रण वाढवतच चालला आहे. आता याला आऊट कसे करायचे हा प्रश्न जणू प्रशासनाला पडला आहे. सोलापूर मध्ये सिद्धरामेश्वरांनी लवकरात लवकर कृपा करून या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव संपुष्टात आणावा हीच ANC News च्या माध्यमातून सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना.

          आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 126 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 115 अहवाल निगेटिव्ह तर 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 6 पुरुष तर 5 स्त्रिया आहेत. रुग्णालयातून आज एकही व्यक्ती कोरोनातून मुक्त होऊन घरी गेलेला नाही, परंतु केगांव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मधून एकूण 225 व्यक्तींना आज मुक्त करण्यात आले. आजवर एकूण 3200 व्यक्तींच्या तपासण्या झालेले असून त्यापैकी 3098 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत तर 102 जणांचे अहवाल हे प्रलंबित आहेत.

आज नव्याने कोरोनाबधित झालेले रुग्ण कोणत्या परिसरातील आहेत हे जाणून घ्या : एकता नगर – 1 स्त्री, किशन संकुल सूत मिल जवळ अक्कलकोट रोड – 1 पुरुष, जवाहर नगर – 1 पुरुष, पाच्छा पेठ – 1 पुरुष, महालक्ष्मी नगर एमआयडीसी रोड – 1 स्त्री, सदर बाजार लष्कर – 1 स्त्री, मिलिंदनगर सोलापूर – 1 पुरुष, बुधवार पेठ – 1 स्त्री, कुमठा नाका – 1 पुरुष, हुडको कॉलनी – 1 स्त्री, रंग भवन परिसर – १ पुरुष.

          आजपर्यंत 275 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 158 पुरुष तर 117 स्त्रिया आहेत. आजवर एकूण मृतांची संख्या ही 17 असून त्यामध्ये 8 पुरुष 9 स्त्रिया आहेत. आजवर एकूण 41 जण हे कोरोनातून मुक्त झाले आहेत. रुग्णालयात दाखल असलेले कोरोना बाधित रुग्ण हे 217 असून त्यामध्ये 121 पुरुष तर 96 स्त्रिया आहेत.

          जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या अहवालानुसार आज तीन रूग्णांचे निधन झाले आहे. ते कोणत्या परिसरातील आहेत ते पाहूया :- 1) मयत झालेली पहिली व्यक्ती ही जवाहर नगर परिसरातील 50 वर्षाचे पुरुष असून त्यांना 9 मे 2020 रोजी सकाळी गंभीर अवस्थेत त्यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे उपचारादरम्यान 9 मे 2020 रोजी सायंकाळी 5:30 वाजता निधन झाले. त्यांचा covid-19 चा रिझल्ट प्राप्त झाला असून तो पॉझिटिव आहे.
2) मयत झालेली दुसरी व्यक्ती सदर बाजार लष्कर परिसरातील 46 वर्षाची महिला असून 8 मे 2020 रोजी रात्री सिव्हिल मध्ये गंभीर अवस्थेत यांनाही दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान 9 मे 2020 रोजी सकाळी 9 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा देखील covid-19 अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव मिळाला आहे.
3) मयत झालेली तिसरी व्यक्ती ही पाच्छा पेठ परिसरातील 68 वर्षाचे पुरुष असून यांनादेखील 9 मे 2020 रोजी दुपारी सिव्हिलमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यांचे 10 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त झाला असून तोदेखील पॉझिटिव आला आहे.

          ANC News च्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी जनतेला आवाहन करीत आहोत की या कोरोना विषाणूला संपुष्टात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी आपले जे काही विचार असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवावेत जेणेकरून आपले विचार हे प्रशासनापर्यंत पोहोचतील. तर मग सुरुवात करा कमेंट बॉक्समध्ये लिहायला आणि सांगा या कोरोना विषाणूला सोलापूर मधून आऊट कसे करायचे???

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: