सोलापुरातून कोरोना हद्दपार होत असल्याचे चिन्ह; आज फक्त 2 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
सोलापूरकरांसाठी आज खुप दिवसानंतर का होईना समाधानकारक बातमी; आज फक्त 2 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर आज रुग्णालयातून तब्बल 31 जण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होऊन घरी गेले

सोलापूर 12 मे 2020 : सोलापूरकरांसाठी आज खुप दिवसानंतर का होईना समाधानकारक बातमी आली आहे. ती म्हणजे आज फक्त दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सोलापूर मध्ये आढळून आले आहेत. सोलापूर वरील कोरोनाचे संकट कमी होत असल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. लवकरात लवकर सोलापूर मधून कोरोनाचे संकट पूर्णपणे नष्ट व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज एकूण 133 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 131 अहवाल निगेटिव्ह तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. हे दोन्ही पॉझिटिव्ह अहवाल स्त्रियांचे आहेत. परंतु 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आज निधन झाले आहे.
आणखी एक आनंदाची बाब म्हणजे आज रुग्णालयातून तब्बल 31 जण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होऊन घरी गेले असून त्यामध्ये 18 पुरुष तर 13 स्त्रिया आहेत. केगाव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मधून एकूण 72 व्यक्तींना आज सोडण्यात आले आहे. आज सापडलेले नवीन रुग्ण हे आसरा सोसायटी होटगी रोड येथील तील एक स्त्री आणि शिक्षक सोसायटी सोलापूर येथील एक स्त्री आहे.
सोलापूरमध्ये आजवर एकूण 277 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये 158 पुरुष तर 119 स्त्रिया आहेत. 19 जणांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले असून त्यामध्ये 9 पुरुष तर 10 स्त्रिया आहेत. रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांची संख्या 72 वर पोचली असून त्यामध्ये 47 पुरुष तर 25 स्त्रीया आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बाधितांची संख्या ही 186 असून 102 पुरुष तर 84 स्त्रिया आहेत.
आज मयत झालेल्या रुग्णांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे :- मयत झालेली एक व्यक्ती ही रविवार पेठ परिसरातील 52 वर्षाची महिला असून 6 मे 2020 रोजी त्यांना सिव्हिलमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते व त्यांचा covid-19 अहवाल 7 मे 2020 रोजी पॉझिटिव आला होता. उपचारादरम्यान 11 मे 2020 रोजी रात्री 8 वाजता त्यांचे निधन झाले. मयत झालेली दुसरी व्यक्ती ही शिवाजीनगर मोदी परिसरातील 71 वर्षांचे पुरुष असून 4 मे 2020 रोजी गंभीर अवस्थेत त्यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते. 6 मे 2020 रोजी त्यांचा covid-19 अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु उपचारादरम्यान 20 मे 2020 रोजी दुपारी 01:45 मिनिटांनी त्यांचे निधन झाले आहे
ANC News च्या माध्यमातून सोलापूरकरांना आम्ही आवाहन करीत आहोत की आजपर्यंत तुम्ही प्रशासनाला जशी साथ दिली त्याचप्रमाणे यापुढेही द्या, स्वतःचे रक्षक स्वतः व्हा, जेणेकरून आपण सर्व मिळून या कोरोनाला सोलापूरातूनच नव्हे तर पूर्ण देशातून हद्दपार करू.