सोलापुरातील 10 विविध भागातून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले; पहा आजची संपूर्ण आकडेवारी… – ANC News
COVID - १९ बातम्यामाझं सोलापूर
Trending

सोलापुरातील 10 विविध भागातून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले; पहा आजची संपूर्ण आकडेवारी…

सोलापूर 20 मे 2020 : आज एकूण 219 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 205 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. आज एकूण 14 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. 3 व्यक्तीचे आज निधन झाले आहे. केगांव येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून आज एकूण 121 व्यक्तींना घरी आले. आज कोरोनातून मुक्त होऊन 7 जण घरी गेले.

          आज सोलापुरातील 10 विविध भागातून कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. ते कोणत्या परिसरातील आहेत हे पहा :- भगवान नगर,पोलीस मुख्यालय सोलापूर – 2 स्त्री, साई बाबा चौक – 1 पुरुष व 2 स्त्री, अशोक चौक – 1 स्त्री, बापूजी नगर – 1 पुरुष, रामवाडी – 1 पुरुष, दक्षिण सादर बाझार – 1 स्त्री, सलगर वस्ती – 1 पुरुष, कुमठा नका – 1 पुरुष, भारतरत्न इंदिरानगर – 2 पुरुष, जुना विडी घरकुल – 1 स्त्री.

          जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर 470 व्यक्ती सोलापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 262 पुरुष तर 208 स्त्रिया आहेत. एकूण मृतांची संख्या ही 33 आहे. यामध्ये 20 पुरुष व 13 स्त्रिया आहेत. आजपर्यंत 175 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामध्ये 105 पुरुष तर 70 स्त्रिया आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 262 असून 137 पुरुष व 125 स्त्रिया आहेत.

          आज मयत झालेल्या व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे :- मयत झालेली एक व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे 2020 रोजी सायंकाळी 05:52 वाजता सिव्हिल मध्ये SARI च्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 18 मे 2020 रोजी रात्री 10:30 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा COVID – 19 चा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.
मयत झालेली दुसरी व्यक्ती अशोक चौक परिसरातील 77 वर्षाचे पुरुष असून 13 मे 2020 रोजी सिव्हिल मध्ये SARI च्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा COVID – 19 चा अहवाल 15 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान 19 मे 2020 रोजी सायंकाळी 6:00 वाजता त्यांचे निधन झाले.
मयत झालेली तिसरी व्यक्ती शनिवार पेठ परिसरातील 64 वर्षाची महिला असून 05 मे 2020 रोजी सिव्हिल मध्ये SARI च्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा COVID – 19 चा अहवाल 07 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान 19 मे 2020 रोजी दुपारी 02:00 वाजता त्यांचे निधन झाले.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: