प्रतिनिधी दिनांक २१ मे २०२० : आज गुरुवार दिनांक २१ मे २०२० रोजी मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध पहाडी आवाजाचे लोकगीत गायक छगन चौगुले यांचे उपचार दरम्यान निधन झाले. यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु काळाने मात केला आणि आज आपल्यातून लोककलावंत हरपला. आखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतलाच. यामुळे मराठी संगीत श्रुष्टीत शोककळा पसरली आहे. या पहाडी आवाजाची गाणी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर गाजले. त्यांनी मराठी पारंपरिक लोकगीते आजच्या युवकांना ऐकण्यास भाग पाडले. त्यांनी खंडोबा, तुळजाभवानी, विठोबा, बाळू मामा, यांच्यावर अस्सल लोकगीते गायली.
“खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली” हे त्यांचे गीत जग प्रसिध्द झाले. आज प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं हे गाणे आवर्जून वाजल जात. त्याच बरोबर “काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन “, ” गार डोंगराची हवा ” , ” तुळजापूरच्या घाटात ” असे गाजलेली गीते त्यांनी गायली. त्यांनी लोककलेला आपले जीवन अर्पण केले होते. आयुष्यभर या लोककलावंताने विविध लोकगीत गायली. त्याचबरोबर त्यांनी विविध देवांची कथाही सांगितल्या. संपूर्ण जागरण गोंधळ सांगत एका पेक्षा एक लोकगीते त्यांनी गायली. ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ यांच्या ध्वनीमुद्रीका आजही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवाजाची ख्याती आज लहानग्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना माहिती आहे. त्यांचा हा खणकर आवाज आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. हे लोककलावंत आपली ही पर्वणी ना कोणत्या स्वार्थासाठी… तर आपली संस्कृती, आपली लोककला सदाबहार राहावी म्हणून, आपलं जगण या लोककलेच्या सेवेत वाहून घेतलेलं असत. त्याच बरोबर ते मुंबई विद्यापीठात लोककलेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अश्या या पहाडी आवाजाच्या प्रतिभावंत लोकगीत कलावंताला ANC News परिवाराकडून आणि ANC News च्या दर्शकाकडून भावपूर्ण श्रद्धांजली त्याच बरोबर त्यांच्या या यशोमय कारकिर्दीला मनाचा मुजरा ….! असा लोककलावंत पुन्हा होणे नाही….!