लाॅकडाऊनच्या कालावधीतील विज बिल माफ करा – ANC News
महाराष्ट्र

लाॅकडाऊनच्या कालावधीतील विज बिल माफ करा

आमदार कृष्णा गजबे यांची उर्जा मंञी नितीन राऊत यांचेकडे मागणी

देसाईगंज- संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असुन बंद पडलेल्या रोजगाराभिमुख उद्योग धंद्यामुळे नागरिकांची आवक जावक पुर्णता ठप्प झाली आहे.लाॅकडाऊन अवधितिल पूर्ण वीजबील माफ करण्याची मागणी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे उर्जा मंञी नितीन राऊत यांचेकडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दि.22 मार्चच्या मध्यरात्री पासुन लाॅकडाऊन करण्यात आले असुन दरम्यान जमावबंदी व संचारबंदी लागु करण्यात आली. यामुळे स्थानिक उद्योग धंदे बंद पडल्याने व रोजगाराभिमुख उद्योग धंदे बंद पडल्याने अनेकांचा रोजगार बुडाला असुन संचारबंदीच्या कालावधीत उपलब्ध संसाधनाच्या भरशावर नागरीक जीवन जगत आहेत.
दरम्यान आवकच बंद झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असुन घरखर्च भागवणेही कठिण झाले असताना व उदरनिर्वाहाचे साधन ठप्प पडले असल्याने हातात रुपयाही उरला नसल्याने घरखर्च भागवयचा कसा?याच विवंचेत असताना अशा स्थितीत धिर सुटलेल्या नागरिकांना जगवणे अत्यावश्यक झाले आहे.
रोजगार हमीचे कामं नाही की कोणतेही उद्योग धंदे सुरू नाहित. अनेकांची स्थिती हातावर आणुन पानावर खानारांपैकीच असल्याने लाॅकडाऊन स्थितीत लावण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आल्याने कुठुनही आवक येणे बंद झाले आहे. यामुळे आधिच आर्थिक चणचण भोगत असताना वीजबील भरणेही सर्वसामान्य, गोरगरीब तसेच छोटे मोठे उद्योगधंदे तसेच किराणा, कापड व इतरही व्यावसायिक ठप्प पडलेल्या उद्योग धंद्यामुळे हतबल झाले आहेत. अशा स्थितीत शासनाने गांभीर्यपुर्वक विचार करून घरगुती वापरासह छोटे मोठे उद्योगधंदे तसेच व्यावसायिकांना धिर देण्याच्या दृष्टीने वापरलेल्या युनिट दरा प्रमाणे विज देयके न देता सरासरी आकारणी विज बिल देऊन उर्वरित सर्व वीजबील माफ करण्याची मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे उर्जा मंञी नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: