रेवप्पा शिवराया पाटील यांच्या स्मरणार्थ कोळीबेट येथे गोरगरीब गरजु कुटुंबांना रोख रक्कम 800 रुपये व लाडु वाटप – ANC News
माझं सोलापूर
Trending

रेवप्पा शिवराया पाटील यांच्या स्मरणार्थ कोळीबेट येथे गोरगरीब गरजु कुटुंबांना रोख रक्कम 800 रुपये व लाडु वाटप

अक्कलको (प्रतिनिधी) :- कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव व लाॅकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या कोळीबेट , बसवनगर, पारधीवस्ती येथील १०० गरिब व गरजू कुटुंबांना स्वामीनाथ पाटील आणि रामेश्वर पाटील यांच्याकडूनं रोख रक्कम ८०० रुपये आर्थिक मदत व गोड लाडु वाटप अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मरोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अविनाश मडीखाबे, रामेश्वर पाटील, स्वामीनाथ पाटील,धनराज पाटिल, सिद्धाराम पाटील, दत्ता पारशेट्टी, अप्पु पारशेट्टी, मल्लू पारशेट्टी, विलास पारशेट्टी, बाबू पारशेट्टी, केदार बिराजदार आदी उपस्थित होते.
          याप्रसंगी बोलताना रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी म्हणाले की राज्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने ज्यांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे अशा कोळीबेट गावातील पारधी वस्ती, बसव नगर येथील १०० गरीब गरजू कुटुंबांना रोख रक्कम ८०० रुपये दिले व गोड लाडु वाटप करण्यात आले कै. रेवप्पा शिवराया पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची मुले रामेश्वर पाटील व स्वामीनाथ पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: