मुळे हॉस्पिटल होणार ५० बेडचे कोविड केअर आयसीयु हॉस्पिटल – ANC News
माझं सोलापूर
Trending

मुळे हॉस्पिटल होणार ५० बेडचे कोविड केअर आयसीयु हॉस्पिटल

सोलापूर प्रशासन व खाजगी रुग्णालयांमधील तिढा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मध्यस्थीने सुटला

सोलापूर २३ मे 2020 : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आता शहरातील हॉस्पिटल देखील कमी पडू लागली आहेत. रोजच्या रोज ३० ते ४० रुग्णांची भर पडत आहे. त्यातच सोलापूर प्रशासन व खासगी हॉस्पिटलस् यांच्यामध्ये मतभेद दिसून येत असल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए), सोलापूर व सोलापूर प्रशासन यांना एकत्रित येऊन सोलापूरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाववर योग्य ते नियोजन व उपाययोजना करण्यासाठी बौठक आयोजित केली. त्यानुसार सोलापूर शहरातील विविध नामांकित हॉस्पिटल तसेच डॉक्टर्स यांनी अनुकुल प्रतिसाद दिला व आमदार प्रणिती शिंदे यांंच्यामुळे सोलापूर प्रशासन व खाजगी हॉस्पिटल यांच्यातील तिढा सुटला व तद्नंतर सर्वांनी कोरोना महामारीच्या विरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित सहभागी होण्याची तयारी दर्शविली.

या बैठकीत खासगी डॉक्टर्सना येणाऱ्या विविध अडचणी व त्यांचे योगदान याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सोलापूर शहरातील अश्विनी, मार्कंडेय, यशोधरा रुग्णालय यांनीही कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची पूर्णत: तयारी दर्शविली आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी मनपा आयुक्त व इंडियन मेडीकल असोसिएशन, सोलापूर यांच्या सहकार्याने सोलापूर शहरामध्ये स्पेशल कोविड केअर हॉस्पिटल उभारणीकरीता चर्चा केली आणि प्रायोगिक तत्वार धनराज गिरजी मुळे हॉस्पिटल, सोलापूर येथे आवश्यक त्या बाबी, साधनसामग्री व सोयी-सुविधांचा आढावा घेऊन ५० बेडचे अतिदक्षता विभाग (आयसीयु) असणारे सुसज्ज असे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करावे, असे मा. मनपा आयुक्त यांना सुचविले आहे
आणि तसेच होम मौदान किंवा नॉर्थकोट मौदान येथे ५०० ते १००) बेडचे सर्व सोयी सुविधायुक्त सुसज्ज असे आयसोलेशन युनिट हे राज्य सरकार व सोमपा यांच्या माध्यमातून तात्काळ उभारणी करण्याचे आ. प्रणिती शिंदे यांनी सुचविले आहे. यावेळी मनपा आयुक्त दिपक तावरे, आयएमए, सोलापूरचे प्रेसिडेंट डॉ. हरिष रायचूर, डॉ. आरकल, डॉ. शिवपूजे, डॉ. घुली, डॉ. परळे व डॉ. कुलकर्णी, नगरसेवक चेतन नरोटे व आदी उपस्थित होते.

आमदार प्रणिती शिंदे यांचे जाहिर आवाहन

सोलापूर शहरातील गर्भवती महिलांनी प्रसुती व इतर उपचार व तपासणीसाठी महापालिकेच्या प्रसुतीगृहांमध्ये करुन घ्यावी. सोलापूर शहरातील ज्या हॉस्पिटल्सना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी करायची आहे व ज्या हॉस्पिटल्सने नोंदणीकरीता अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर व आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: