मानसिकता कोरोनाकडे बघण्याची !!! – ANC News
आरोग्य व शिक्षण
Trending

मानसिकता कोरोनाकडे बघण्याची !!!

लेखक - संतोष कुमठाळे

कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूशी लढताना सर्वप्रथम आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कोरोनो विषाणू पेक्षा आपण भीती आणि मानसिकतेचेच शिकार झालो आहोत, असं कुठं ना कुठं वाटतंय. आपण सर्व जण जो पर्यंत एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून वागू शकत नाही, तो पर्यंत आपण या विषाणूवर विजय मिळवू शकत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मग ते लवकर लक्षात येईल किंवा समजायला सोप्प जाईल.

एका कोविड योध्याला कोरोनाची लागण झाली. आता यामध्ये त्या योध्याची काहीच चुकी नाही. सातत्याने काम केल्यामुळे आणि कोविड रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळें त्या कोविड योध्याला लागण झाल्यानंतर त्यानी हॉस्पिटला कॉल केला व त्यानंतर त्याला घेऊन जाण्यासाठी एक ambulance त्यांच्या घरी आली. त्यांच्या घरापासूनचा 1 किलोमीटर पर्यंत चा जो area आहे. तिथले लोक स्वतःच घर सोडून त्याला पाहण्यासाठी रोड वर येतात. नुसतं रोड वर पाहत थांबायचं नाही तर उलट सुलट त्याच्यावर 1 तास चर्चा रंगवतात. चर्चा, गप्पा मारायला तो काही राजकीय विषय आहे का ? कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त चर्चा राजकारणावरच होते. भलेही आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण आहे, हे माहित नसताना चर्चा मात्र मंत्रिमंडळातील मंडळींपेक्षा भारी. ते जाऊ द्या पण मला एक कळतं नाही कोविड 19 रुग्ण सापडला (कोविड 19 योध्यला) त्याला काय हौस आहे का? लागण करून घ्यायची, का त्यानी विषाणूला पत्र, Email देऊन कळवलंय हा माझा पत्ता आहे, हे माझं नाव आहे, तू आमच्या घरी ये आपण दोघे माझ्या कुटुंबासोबत hospital ला जाऊ.

कोविड 19 योध्यला एखाद्या गुन्हेगारासारखं का पाहिलं जातंय. त्यानं लागण झाल्यानंतर ते समाजाला गुन्हेगार का वाटतात. उलट सर्वांनी मिळून त्यानं प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कोरोना सारख्या विषाणू पासून लवकरात लवकर कोरोना मुक्त होण्यासाठी. शहरी भागात लोकांनी आपापली गल्ली, वस्ती सील करून घेतले कोणीही यायचं नाही की कोणी जायचं नाही म्हणून. पण आम्ही मात्र घरातून बाहेर पडणार, आमच्या गल्लीत फिरणार याला काय अर्थ आहे ? गल्ली बोळ सील केल्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना किती त्रास होईल, याचा कोणी विचारच केला नसेल. मग ते मेडिकल, गॅस, कचरावला, दुधवाले हे सगळे असतील तर त्यांनी ते सील बंद बघून परत लांब जाऊन फिरुन यायला पाहिजे का ? मी मध्ये social media वर एक फोटो पहिला होता . त्या फोटो मध्ये असं दिसून येत होतं की, खेडेगावच्या वेशी, सीमा पूर्णपणे दगड लावून सील केले होते. परंतु एका ambulance चालकाला त्या गावामध्ये जायचं होतं, परंतु गावच्या वेशी बंद असल्यामुळे Ambulance चालकालाच स्वत: त्या रस्त्यातील दगडं काढायला यावं लागलं. किती वाईट दिसतंय हे चित्र आणि दगड काढे पर्यंत चालकाला उशीर झाला, गावात पोहोचला तर मग गाववालेच चालकाला रागात मारहाण करतील मग याला कोण जबाबदार. मी असं म्हणत नाही की तुम्ही गावच्या वेशी बंद करू नका बंद करा परंतु त्याच सोबत पहारा ठेवायला शिफ्ट नुसार गावातील काही तरुण युवकांना उभे करा, जेणेकरून सगळ्यांचं Problem solve होण्यास मदत होईल.

या सर्व मानसिकता आपण बदलणं गरजेचं आहे. परवा न्यूज चॅनेल वर पाहिलं एक रुग्ण कोरोनाला हरवून त्यांच्या स्वतःच्या घरी आला, त्याचं घर एका Apartment मध्ये होतं परंतु, लोकांनी त्याला त्याच्याच घरात राहू दिलं नाही, हकलून लावलं त्याला Apartment मधून ही कोणती विचित्र मानसिकता म्हणायची लोकांची. आपल्या परंपरेचे विदेशात गुणगाण गायले जातात. जर आपणच आपली माणुसकीची परंपरा विसरू लागलो, तर आपणच आपल्या देशाला संकटात टाकत आहोत. आपल्याला खायला अजूनही अन्नच भेटत आहे. म्हणजे आपण अजूनही माणसंच आहोत हे तरी विसरता कामा नये.

प्रत्येक गोष्ट देशावर, सरकार वर टाकूनही चालत नाही कारण ते ही देश चालवणारी माणसंच आहेत. त्या पेक्षा प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून वागल्यास आपल्या आरोग्य सेवांवर पण ताण येणार नाही आणि आपणही स्वतःची काळजी घेतल्यामुळे आपले ही आरोग्य सांभाळू शकतो.

या देशाचं, समाजाचं आपण काही तरी देणं लागतो, हे कुठं ना कुठं आपल्या ध्यानात असणं गरजेचं आहे. आपल्या मुळे देश, समाज नाही तर त्यांच्या मुळे आपण आहोत ही भावना जोपासणे अत्यंत गरजेची आहे. आपण प्रत्येक जण आपल्या देशाची सेवा करू शकतो त्यासाठी Border वरच जायला पाहिजे, असं ही नाही प्रत्येकाने तोंडाला मास्क घालूनच घहारातून बाहेर पडावं, जर घरा बाहेर पडायचंच असेल, तर कमीत कमी 1-2 मीटर अंतर ठेवावं व वारंवार आपले हात स्वच्छ साबणाने धुवावे, एवढं केलं तरी प्रत्येकाने आपल्या देशासाठी एक छोटंसं पाऊल टाकलं असं मला वाटतं..
“Mentality is the way to look at any problem.”

लेखक – संतोष कुमठाळे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: