माझे अंगण हेच माझे रणांगण ! असे म्हणत शिवशंकर स्वामी दिला घराच्या अंगणात केला महाराष्ट्र बचाओचा नारा..
सर्व देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा COVID-19 च्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे परंतु संपूर्ण देशामध्ये COVID-19 चे सर्वाधिक रुग्ण सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यु दरात दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक 1 वर पोहोचलेली आहे, राज्य सरकारच्या नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या गोष्टीकडे होत असलेल्या दुर्लक्ष यामुळे आज महाराष्ट्रातील जनतेची अशाप्रकारे दुर्दैवी अवस्था झालेली आहे राज्यामध्ये प्रशासन नावाचं यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही याचं प्रश्न जनते समोर निर्माण झालेली आहे.
● महाराष्ट्र करिता आर्थिक पॅकेज घोषित करा
● रिक्षाचालक टॅक्सीचालक घरकामगार बारा बलुतेदारांना भरघोस आर्थिक मदत करा
● आधारभूत किमतीवर धान्य खरेदी चालू करा
● सरसकट संपूर्ण कर्जमाफी करा
● वीज बिल माफ करा
● शाळेची फी रद्द करा
● शिधा पत्रक नसलेल्यांना धान्य द्या
● शिधापत्रिकेवर साखर किराणा डाळ देण्यास सुरुवात करा
● विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिकांना यांच्या मोफत प्रवासाची सोय करा
● खाजगी रुग्णालयात सर्वांना उपचार मोफत करा
● संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना योजनांचे पैसे त्वरित द्या
● शेतकऱ्याला बी बियाणे खाते मोफत उपलब्ध करून द्या
● तीन महिन्याचे घरभाडे माफ करा
या सर्व मुद्यांवर राज्यातील तिघाडी सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेली आहे, त्यासाठी आज घरच्या उभा राहून महाविकास आघाडी सरकारच्या आकारक्षमपणाचा शिवशंकर स्वामी यांनी जाहीर निषेध केला..!