मांग वडगाव पारधी हत्याकांडाने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली – उत्तरेश्वर कांबळे – ANC News
महाराष्ट्र
Trending

मांग वडगाव पारधी हत्याकांडाने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली – उत्तरेश्वर कांबळे

उत्तरेश्वर कांबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष (भीम आर्मी)

केज तालुक्यातील मांगवडगांव येथे जमिनीच्या वादातून जातीयवादी गावगुंडानी पारधी समाजातील बाबू शंकर पवार वय- (70) प्रकाश बाबू पवार वय -(50) संजय बाबू पवार वय -(45)या तिघांची अंत्यत अमानुषपणे हत्या केली आहे. या हत्याकांडाचा कट पुर्व नियोजित होता या हत्याकांडांने पुरोगामी महाराष्ट्राची मान पुन्हा शरमेने खाली गेली. असे भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

जातीयवादी गावगुंडानी पारधी कुटूंबावर अनेकदा प्राणघातक हल्ले केले होते म्हणून त्यांच्या दहशतीला कंटाळून हे पारधी कुटूंब अंबाजोगाईला राहत होते. न्यायालयीन लढाई जिंकून पारधी कुटूंबाने ही जमिन पुन्हा मिळवली होती म्हणून जातीयवाद्यांच्या मनात अनेक वर्षेपासुन त्याचे शल्य होते.
या हत्याकांड प्रकरणी पोलीसांनी सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत मोहन निंबाळकर, राजेभाऊ काशिनाथ निंबाळकर,बाळासाहेब बाबू निंबाळकर, राजाभाऊ हरिचंद्र निंबाळकर, अशोक अरूण शेंडगे, कुणाल राजाभाऊ निंबाळकर, शिवाजी बबन निंबाळकर, बबन दगडू निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर आणी संतोष सुधाकर गव्हाणे अशा 12 जातीयवादी गावगुंडांना संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही उत्तरेश्वर कांबळे यांनी केली.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: