प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून 22 हजार गरजू लोकांना अन्नदान…. – ANC News
महाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending

प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून 22 हजार गरजू लोकांना अन्नदान….

1000 कुटुंबांना पुरवले अन्नधान्याचे किट. रोज 300+ लोकांना जेवण दिले जाते. स्वतःच्या अडचणीच्या काळात ही जपली सामाजिक बांधिलकी. आश्रम उभारणीसाठी जमा केलेला एक एक रुपया दिला अन्नदानासाठी केला खर्च.

सोलापुर दि.21 मे 2020 : सध्या संपूर्ण देश कोरोनासोबत लढत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊनची परिस्थिती आहे. प्रशासन, पोलीस, डॉक्टर, अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच काही सामाजिक संस्था ही या लढ्यात सहभागी आहेत.

          कोरोनाच्या या लढ्यात कोणाची उपासमार होणार नाही या साठी सोलापूर येथील प्रार्थना फाऊंडेशन या समाजीम संस्थेने ही पुढाकार घेतला आहे. 22 मार्च जनता कर्फ्यु ते आज तागायत रोज प्रार्थना फाऊंडेशन मधू जवळपास 300+ लोकांना जेवण दिले जाते,संस्थेच्या माध्यमातून आत्ता पर्यंत 22 हजार लोकांना अन्नदान करण्यात आले आहे तर 1000 कुटुंबांना अन्नधान्याचे किट, किराणा, काही कुटुंबांना भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. जवळपास रोज चार ते पाच हजार रुपयांचे जेवण, किराणा, भाजीपाला, चहा, नाष्टा, बिस्कीट, पाणी व जीवनावश्यक वस्तू प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत पोहचतात.

जे लोक भिक्षा मागून जगतात,ज्यांचे हातावरचे पोट आहे,जे मजूर आहेत, परराज्यातील कामासाठी आलेले कुटुंब, स्थलांतर करून पोट भरण्यासाठी आलेले लोक, विद्यार्थी, समाजातील तृतीयपंथी बांधव तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला, झोपडपट्टी भागात राहणारे कुटुंब या सर्व गरजू कुटुंबांना प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि लॉक डाऊनची परिस्थिती संपेपर्यंत ही मदत सुरूच राहणार असल्याचे संस्थेच्या सचिव अनु मोहिते यांनी सांगितले.

          प्रार्थना फाऊंडेशन ही संस्था आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, निराधार, बेघर, वंचित, उपेक्षित मुलांसाठी व अनाथ, बेघर आजी आजोबांसाठी काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून आश्रम उभारणीसाठी जमा केलेले पैसे कोरोनाच्या संकटात कोणाचा ही भूकबळी पडू नये म्हणून वापरण्यात येत आहे. आश्रम उभारणीसाठी जमा केलेले पैसे व समाजातून मदत म्हणून आलेली रक्कम तसेच पुरस्कारातून मिळालेली रक्कम अशी एकूण सर्व रक्कम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सेवेसाठी देण्यात आल्याचे मत संस्थेचे प्रमुख प्रसाद मोहिते यांनी व्यक्त केले.
रोजचे जेवण बनवणे व वाटणे या कामामध्ये गिविंद तिरणगारी, मुकेश जमादार, रोहित कोळेकर, सिद्रय्या पाटील, प्रसाद बिराजदार, कोमल वडवराव, रोहिणी लेंढवे यांचे सहकार्य मिळत आहे.

◆ आश्रमाचे बांधकाम करण्यास उशीर झाला तरी चालेल पहिला आपला देश महत्वाचा आहे या काळात कोणी ही उपाशी राहता काम नये ही आपली नैतिक जबाबदारी आहे.आश्रम उभारणीसाठी समाजाकडून पैसा जमा केला होता तोच आत्ता या देशयाच्या संकटात समाजासाठी वापरत आहोत. या प्रसंगी आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

अनु मोहिते
सचिव प्रार्थना फाऊंडेशन

◆ मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या वडीलांनी शेतीकर्जाला कंटाळून आत्महत्या केली.शेतकरी असल्यामुळे कोणी उपाशी राहताना पाहू शकत नाही. त्या साठी हा सगळा अट्टहास.आश्रमाचे बांधकाम नंतर उभा करता येईल पण मानस परत उभा करता येणार नाहीत म्हणून समाजाकडून जमा केलेली ही मदत देशाच्या संकटसमयी समाजाला परत देण्याचा निर्णय घेतला…..

प्रसाद मोहिते
प्रार्थना फाऊंडेशन

◆ मदतीचे आव्हान:-
या संकटाच्या वेळ आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आहे. कित्तेक लोक उपाशीपोटी झोपत आहेत कित्येकांना अन्नधान्य नसल्यामुळे त्यांच्या घरात चूल पेटत नाही.अश्या लोकांना आपण मदत केली पाहिजे.आपण अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, किंवा आर्थिक मदत संस्थेला जमा करू शकता ती आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहचू.
मदतीसाठी संपर्क 9545992026/9049063829
आपण आपली मदत खालील बँक खात्यात जमा करू शकता.

Prathana Foundation/प्रार्थना फाऊंडेशन
IDBI Bank,Vijapur road, solapur
A/c :- 0410104000158862
IFSC No :- IBKL0000410
9545992026/9049063829

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: