पारधी हत्याकांडांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा- उत्तरेश्वर कांबळे

२४/५/२०२०
प्रतिनिधी – सोलापूर
मांगवडगांव ता.केज येथे जमिनीच्या वादातून जातीयवादी लोकांनी पारधी समाजातील 3 जणांनी निर्घूण पणे हत्या केली आहे. या हत्याकांडांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी युवा सामाजिक कार्यकर्ते तथा भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे .
13 मे च्या रात्री 10 पासुन या हत्याकांडांचा थरार पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता जातीयवादी गावगुंडानी अंत्यत क्रुरपणे हत्याकांड घडवल्याने महाराष्ट्रातील पारधी समाजात घबराटी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी जमिनीच्या वादातून अनुसूचित जाती -जमातीच्या नागरिकांवर अन्याय अत्याचार सुरू आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष सरकारी वकीलांच्या मार्फत पारधी हत्याकांडाचा घटला अवघ्या 5 महिन्यात निकाली काढवा, तसेच पिडीत कुटूंबातील प्रत्येकी एकाला शासकीय सेवेत घेऊन मुख्य प्रवाहात आणावे व प्रत्येक 50 लाख रुपये आर्थिक सहाय्य द्यावे असे ही उत्तरेश्वर कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.