पत्रकारांना संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळणार नाही : यशवंत पवार (प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र)
जोपर्यंत पत्रकार संघटित होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषण करत नाहीत तोपर्यंत पत्रकारांना शासकीय योजनेचा लाभ अथवा इतर सोयी सवलती मिळणार नाहीत याची समस्त पत्रकारांनी नोंद घ्यावी

पत्रकार नोंदणी
देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्षे झालीत परंतु सर्वच पत्रकारांनी शासन दरबारात पत्रकार म्हूणन नोंदणी नाही ही बाब खरोखरच खेदाची व शरमेची म्हणावी लागेल देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांचा सहभाग मोठया प्रमाणात होता याचा राज्यकर्त्यांना विसर पडलेला आहे
पत्रकार संरक्षण कायदा
बातमी लावण्यावरून पत्रकारांना धमकी मारहाण जीवघेणे होण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली असून लोकशाही चा चौथास्तंभ आता नामशेष होण्याच्या मार्गांवर असून पत्रकारिता म्हणजे सुळावरील पोळी अशी केविलवाणी व बिकट अवस्था निर्माण झाली असून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण मिळाले पाहिजे ते मिळत नाही
जेष्ठ पत्रकार पेन्शन योजना
देशातील अनेक पत्रकारांनी विविध माध्यमात आपले उभे आयुष्य खर्ची घालून देखील सरकार च्या जाचक अटी मुळे अशा खऱ्या व प्रामाणिक पत्रकारांना उर्वरित आयुष्य सुखाने व समाधानाने जगता येत नाही अश्या वृद्ध व जेष्ठ पत्रकारांना औषध उपचार साठी उदार उसनवारी किंवा घरजागा अथवा सोने गहाण ठेवावं लागत आहे ज्या पत्रकारांनी अखंड आयुष्यभर सेवा म्हूणन पत्रकारिता केली त्यांचे उर्वरित आयुष्य खूप वेदनादायी होत आहे हाल सोसून जीवन जगत आहेत
*पत्रकारांवर दाखल होणारे खोटे गुन्हे*
हल्ली बातमी विरोधात बातमी लावली म्हूणन पत्रकारांवर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून ही बाब खूपच गंभीर आहे कोणतीही शहनिशा न करताच गुन्हे दाखल होत आहेत याबाबत सखोल चौकशी करण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासन करत नाही त्यामुळे पत्रकारांना कोर्टाच्या पायऱ्या चढावे लागत आहेत हा प्रकार खूपच त्रासदायक व डोकेदुखी ठरत आहे
पत्रकारांनी संघटित असणे गरजेचे आहे
आज पत्रकार संघटना मोठया प्रमाणात निर्माण झाल्या असून केवळ वर्गणी घेऊन व सदस्य नोंदणी करून केवळ कागदावर संघटना काम करत आहेत काही बोटावर मोजण्या इतक्या पत्रकार संघटना पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन शासन दरबारी भांडून पत्रकार वरील झालेल्या अन्याय बाबत आवाज व उठाव करून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत इतर संघटना केवळ नावापुरत्या राहिल्या आहेत
जोपर्यंत पत्रकार संघटित होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषण करत नाहीत तोपर्यंत पत्रकारांना शासकीय योजनेचा लाभ अथवा इतर सोयी सवलती मिळणार नाहीत याची समस्त पत्रकारांनी नोंद घ्यावी
यशवंत पवार
प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र